मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. त्यामुळे त्यांना कोरोनाची चाचणी केली होती. त्याच्या या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रांनी यासंदर्भात बातमी दिली आहे. (Deputy CM Ajit Pawar tested Corona Positive)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैद्यकीय चाचणी केली होती. सुरुवातीला त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता, मात्र पुन्हा त्यांची स्वॅब चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रांनी यासंदर्भात वृत्त दिलं आहे. मात्र अद्याप अजित पवारांनी याबाबतची कोणतीही माहिती दिलेली नाही.
दरम्यान राज्यात अतिवृष्टीमुळं प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाणार होता. मात्र अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्यामुळेच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पुढे ढकलल्याची माहिती आहे.
अजित पवारांनी शनिवारी बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. अजित पवारांनी शनिवारी सकाळी बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पंढरपूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पुरामुळे बाधित झालेले रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अजित पवार हा दौरा आटोपून परतल्यानंतर, त्यांना कणकण जाणवत होती. त्याशिवाय त्यांना तापही आला. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यातील एका चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र आणखी एक चाचणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सकाळी बारामतीत जाऊन, पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी अजित पवारांनी नद्यांसह ओढ्याभोवतीची अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले. अजित पवार म्हणाले, “नदी-ओढ्याभोवतीची अतिक्रमणं तातडीने हटवा. माझं- अजित पवारांचे अतिक्रमण असेल तरी मुलाहिजा बाळगू नका” (Deputy CM Ajit Pawar tested Corona Positive)
संबंधित बातम्या :
अजित पवारांनी दौरे टाळले, कणकण आणि ताप आल्याने घरीच विश्रांती, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
ये दादा का स्टाईल है! बांधावर उभं राहून दादा म्हणाले, अजित पवारचाही मुलाहिजा बाळगू नका!