मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Devendra fadanvis Allegation Police officer Sachi Vaze)
“मी आज विधानसभेत मुकेश अंबानींच्या घराबाहेर जी जिलेटिन भरलेली स्कॉर्पिओ मिळाली होती, त्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. मनसुख हिरेन यांची ही गाडी होती. त्यांची गाडी चोरीला गेली होती. त्यांची गाडी बंद झाली तिथून ते क्रॉफर्ड मार्केटला आले होते. तिथे ते एका व्यक्तीला भेटले, तो व्यक्ती कोण? हे या प्रकरणाचं मूळ आहे. ही गाडी जिथे सापडली, तिथे लोकल पोलिसांच्या आधी सचिन वाझे हे कसे पोहोचले? त्यांनाच धमकीची ती चिठ्ठी कशी मिळाली?”, असा सवाल फडणवीस यांनी विचारला.
“सचिन वाझे यांचं घर ठाण्यात, जी गाडी चोरी झाली ती सुद्धा ठाण्यातील, इतकंच नाही जी गाडी चोरी होऊन ज्या रुटने आली आणि तिथे पार्क झाली, तिच्यासोबत सफेद इनोव्हा ठाण्यातूनच आली. एक गाडी पार्क झाली आणि एक निघून गेली. त्याच सचिन वाझे यांना IO म्हणजे तपास अधिकारी नेमलं”.
“सचिन वाझे सगळ्यात आधी पोहोचले. त्यांनी चिठ्ठी हातात घेतली,. त्यांनाच चौकशी अधिकारी नेमलं. आश्चर्य म्हणजे जून-जुलैमध्ये २०२० मध्ये सचिन वाझेंचं या गाडी मालकाशी संभाषण झालं होतं.. योगायोग म्हणजे गाडीमालक ठाण्यातले, आयओ ठाण्यातले, ही गाडी ठाण्यातली, त्याच्यासोबत एक गाडी आली ती ठाण्यातूनच आली, त्यापेक्षा संशयास्पद बाब म्हणजे एका टेलिग्राम चॅनलवर एक संघटनेच्या नावाने जयशूल हिंद हा आम्ही अटॅक केलीय, ही गाडी आम्ही ठेवलीय, आम्हाला रॅनसम द्या, क्रिप्टो करन्सी द्या असं पत्र प्रसिद्ध झालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी जय शूल या संघटनेने एक मेल पाठवला आणि सांगितलं आमचा याच्याशी संबंध नाही”.
“यामध्ये मी एक शक्यता वर्तवली होती, यातील सर्वात महत्त्वाचा दुवा मनसुख हिरेन हे होते. त्यांना तात्काळ सुरक्षा द्यायला हवी. मला आताच माहिती मिळाली, मनसुख हिरेन यांची बॉडी ठाण्याजवळ मुंब्र्याच्या जवळपास सापडली आहे, त्यामुळे हे प्रकरण गंभीरच नाही तर अत्यंत गुंतागुंतीचं आणि सर्वांकरिता चॅलेंजिग आहे. मला वाटतं हा जो योगायोग आहे, यातून जो संशय तयार झालाय आणि इतका प्राईम विटनेसची बॉडी मिळते, निश्चितच यामध्ये काही गौडबंगाल आहे. त्यामुळे ही केस तात्काळ NIA ला दिली पाहिजे आणि यामागील सत्य बाहेर यायला हवं”.
(Devendra fadanvis Allegation Police officer Sachi Vaze)
हे ही वाचा :
मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला