Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंकडून माईक हिसकावला, उद्धव ठाकरेंची खोचक टीका; आता फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

| Updated on: Jul 05, 2022 | 6:12 PM

विरोधकांवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ' काँग्रेसनेही मोदीजींना चायवाला म्हणून हिणवलं. पण ज्याला हिणवलं त्यांनीच यांच्यावर पाणी पिण्याची वेळ आणली.'

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंकडून माईक हिसकावला, उद्धव ठाकरेंची खोचक टीका; आता फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर
Image Credit source: twitter
Follow us on

नागपूरः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बोलण्याच्या तयारीत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) त्यांच्याकडून माइक हिसकावून घेतला. काल तर माइक हिसकावला, उद्या आणखी काय हिसकावतील, असा टोला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लगावला. यावर देवेंद्र फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे आणि आमची काळजी तुम्ही करू नका. आम्ही एकमेकांच्या गोष्टी हिसकावणार नाहीत तर परस्परांना गोष्टी देणार आहोत. पुढील अडीच वर्ष हे सरकार उत्तम चालेल आणि त्यानंतरही आम्ही बहुमताने निवडून येऊ, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस प्रथमच नागपूरमध्ये गेले. दुपारी मोठी विजयी रॅली काढून त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, माइक हिसकावला…

विश्वासमत सिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातातील माईक देवेंद्र फडणवीसांनी हिसकावला, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ आम्ही ज्या वेळी विश्वासमत जिंकलो. मीच पहिल्यांदा बोलायला उभा राहिलो. उद्धवजी फार काळ अधिवेशनात आले नाहीत. त्यांना माहिती नाही. मुख्यमंत्री जिंकतात, तेव्हा ते आधी भाषण करत नसतात. आधी सगळे लोक अभिनंदनाचं भाषण करतात. नंतर ते आभार मानतात. उपमुख्यमंत्री म्हणून माझी ती जबाबदारी होती. त्यामुळे मी त्या ठिकाणी ते भाषण केलं. एवढंच सांगतो. आमची चिंता करू नका. आम्ही एकमेकांना देणार आहोत. एकमेकांकडून घेणार नाहीत.ट

… तर घरी बसलो असतो

देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. यावरून सर्वत्र टीका होतेय. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘ ज्या वरिष्ठ नेत्यांनी मला यापूर्वी मुख्यमंत्री हे सर्वोच्च पद दिलं. त्यांनीच आज मला हा आदेश दिला. पक्षादेश मानणं हे माझ्यासाठी सर्वोच्च आहे. ते घरी बस म्हणाले असते तर मी बसलो असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी होतील आणि या यशात माझाही वाटा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे पी नड्डा यांचा सहभाग होता. तसेच या सर्व मोहिमेत पूर्ण क्षमतेने गृहमंत्री अमित शहा हेदेखील खंबीरपणे पाठिशी उभे होते. त्यामुळेच आम्ही हे काम करू शकलो. आज त्यांचेही मी आभार मानतो.’

सोन्याचा चमचा घेऊन पैदा होणाऱ्यांनी लक्षात ठेवा…

विरोधकांवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ काँग्रेसनेही मोदीजींना चायवाला म्हणून हिणवलं. पण ज्याला हिणवलं त्यांनीच यांच्यावर पाणी पिण्याची वेळ आणली. मोदीजींनी असं पाणी पाजलं की आज त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे, हे तुम्ही बघताय. आम्ही रिक्षेवाले असू तर.. पानटपरीवाले असू तर आम्हाला अभिमान आहे. कारण सोन्याचा चमचा घेऊन जे लोक पैदा होतात, त्यांनी हे समजूनन घ्यावं की, या देशात स्वाभिमानाने जो जगतो… तो सामान्य माणूसच सेवा करणार आहे…