मुंबई : मविआने मुंबईत महामोर्चा आयोजित केला, राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केला, असा राज्यपालांवर आरोप आहे, राज्यपाल बदलण्यात यावेत अशी मागणी मविआने केली आहे. मविआने आज यासाठी क्रुडास कंपनी (जेजे हॉस्पिटल) ते सीएसएमटी असा मोर्चा काढला. पण हा मोर्चा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया देताना, मविआच्या मोर्चाला आपण गंभीरतेने घेत नाहीत असं बोलण्यातून दाखवलं आहे. “मविआचा हा मोर्चा अशस्वी आहे, कारण पाहिजे तेवढी गर्दी झाली नाही, मविआ मोर्चाला गर्दी जमवण्यात अशस्वी आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आझाद मैदान एवढी तरी गर्दी मविआने जमवायला हवी होती, यावरुन मविआच्या मोर्चाला लोकांनी प्रतिसाद दिलेला नाही, असं दिसून येतय, त्यात मविआ महामोर्चा काढण्यात अशस्वी असल्याचे, देवेंद्र फडणवीस यांनी महामोर्चावरील आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
या महामोर्चाला आज दुपारी १२ ला सुरुवात झाली, या मोर्चात मविआच्या पक्ष कार्यकर्त्यांसह डाव्या विचारांच्या काही संघटना देखील सहभागी असल्याचं दिसून आलं. यात काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे झेंडे दिसत होते, शिवसेनेचे भगवे झेंडे देखील दिसून आले, तर निळ्या झेंड्यांचीही उपस्थिती होती. या मोर्चात सुषमा अंधारे या देखील उपस्थित होत्या.
महामोर्चात सुप्रिया सुळे,संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड, भाई जगताप यांचा देखील मोर्चात पायी चालताना दिसले. मुस्लिम बहुल भागातून हा मोर्चा जात असताना एका मुस्लिम महिलेने मोर्चावर गुलाब पाकळ्यांनी वर्षाव केला.