मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. विधानसभेत छातीठोकपणे सांगणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शार्जिल उस्मानी (Sharjeel Usmani) येऊन गेला तरी काही करु शकले नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून मुख्यमंत्र्यांवर घणाघात केला.
आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, ‘शार्जिल उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्यात असेल तर त्याच्या मुसक्या…
Posted by Devendra Fadnavis on Tuesday, 16 March 2021
शर्जील उस्मानी पाताळात गेला तरी त्याला सोडणार नाही, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. मग आता ते पाताळात जाऊन शर्जीलला कधी पकडून आणणार, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला. शर्जील उस्मानी ही उत्तर प्रदेशातील घाण आहे, आमच्याकडील नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सुनावले होते.
पुण्यातील एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शार्जिल उस्मानीने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ‘हिंदू समाज आहा पूर्णपणे सडला आहे’ असं वक्तव्य त्याने केलं होतं. ‘हिंदुस्तान मे हिंदू समाज बुरी तरिकेसे सड चुका है’, शरजिल उस्मानी याचं हे विधान भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक 153A आणि 295A अनुसार गुन्हा ठरते, अशी तक्रार भाजपने पुणे पोलिसात केली होती.
संबंधित बातम्या
फडणवीस म्हणाले, शर्जील उस्मानी पाताळात गेला तरी सोडणार नाही, उद्धव म्हणाले, मग कधी जाताय?
Sharjeel Usmani : हिंदू समाज सडका झालाय म्हणणारा शरजील उस्मानी कोण आहे?