मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अटक (Navneet Rana Ravi Rana Arrest) करण्यात आली. त्यानंतर त्यांना कस्टडीमध्ये हीन वागणूक दिली गेली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मातोश्री बाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दिला होता. त्यानंतर मोठा गदारोळ मुंबईत पाहायला मिळाला. खार येथील राणा यांच्या निवासस्थानी शनिवारी शिवसैनिकांनी हल्लाबोल केला होता. दुपारी राणांनी मातोश्रीवर (Matoshree) न जाण्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर संध्याकाळी राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, नवनीत राणा यांना भायखळ्यातील कोठडीत ठेवण्यात आलं. शनिवार आणि रविवारची रात्र कोठडीत घालवलेल्या नवनीत राणा यांना कस्टडीत हीन वागणूक देण्यात आली, असा घणाघाती आरोप फडणवीस यांनी केला.
पिण्याचं पाणी नवनीत राणा यांना देण्यात आलं नाही, वॉशरुमला जायचं होतं, जाऊ दिलं नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. आता या सगळ्याबाबत त्यांनी त्यांच्या वकिलांमार्फत लोकसभेच्या सभापतींकडे तक्रार केली असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर आंदोलन करु म्हटलं होतं का? हल्ला करु म्हटलं होतं का? गैरप्रकार करु म्हटलं होतं का? पण हनुमान चालिसा करण्यास इतका विरोध! हनूमान चालिसा महाराष्ट्रात नाही म्हणायची तर पाकिस्तानात म्हणायची? एका स्त्री करीता हजारो लोक जमा करता, त्यांच्या घरी जाऊन पोलीस अटक करतात. जणू पाकिस्तानचं युद्ध जिंकल्यासारखं युद्ध करतात. आणि मग मुख्यमंत्री कुठल्या आजीकडे चालले आहेत, जणू काही युद्ध जिंकले आहे.
अरे एसटीच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेटले असता, शेतकरी आत्महत्यागस्त कुटुंबाला भेटलं असतं तर समजलं असतं. आजीकडे गेल्यानंतर तिने काय सुनावलं हे आपण बघितलं, त्यांनी कुठं जावं हा त्यांचा संबंध, पण किती द्वेष आहे! एका महिला खासदाराला नामोरहम करण्यासाठी रिमांडमध्ये वेगळं सेक्शन, दुसऱ्या दिवशी राजद्रोहाचा सेक्शन, काय तर हनुमान चालिसा म्हटल्याने यांचं राज्य उलथतं? हनुमान चालिसा म्हणणं राजद्रोह होत असेल तर मी आता हनुमान चालिसा म्हणतो…
यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान चालिसाही म्हणून दाखवली. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारसोबत संघर्षाशिवाय आम्हाला पर्याय नाही, असंही ते म्हणालेत. आम्ही लोकशाहीने वागतोय, आमच्याशी ठोकशाहीने वागले, तर तसंच उत्तर देऊ, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय.
नवरात्रात रात्रभर भजन, गर्बा व्हायचा, गणपतीचे कार्यक्रम रात्रीही व्हायचे, ज्या दिवशी सरकारने सांगितलं. 10 नंतर माईक नाही, त्यानंतर आम्ही ते बंद केलं, 12 दिवस जी सूट मिळते, त्यातच आम्ही 12 वाजेपर्यंत ते वाजवतो, असं फडणवीस म्हणालेत.
जर सुप्रीम कोर्टाचे आदेश हिंदू समाज मान्य करत असेल, तर तो आदेश इतर समाजांनीही मान्य केलाच पाहिजे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन झालंच पाहिजे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचंही देवेंद्र फडणवीसांना एकप्रकारे समर्थन केलंय.
हिटलरसारखं कुणी वागत असेल, तर संवादापेक्षा संघर्ष बरा; फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील ‘सुप्रीम’ सुनावणी पुढे ढकलली! आता कधी सुनावणी?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं केंद्रीय गृहसचिवांना पत्र; पत्रातील 10 महत्त्वाचे मुद्दे