पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर सडकून टीका केलीय. राज्य सरकारच्या तिजोरीत मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च करायला 90-90 कोटी रुपये आहेत, दारुची अनुज्ञप्ती द्यायला पैसे आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारने सरकारकडे पैसे नाहीत ही नाटकं बंद करावीत, अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर पंतप्रधान मोदींची विमा योजना बासणात गुंडाळल्याचाही आरोप केला (Devendra Fadnavis criticize Thackeray Government of Farmer Policy in Pune).
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे मेमोरंडम गेल्यानंतरच केंद्रीय पथक येत असतं. राज्य सरकारने मेमोरंडम उशिरा पाठवला. मात्र, केंद्रीय पथक योग्य तोच अहवाल देईल असं वाटतं. राज्य सरकारच्या तिजोरीत मंत्र्यांच्या बंगल्यावर नव्वद नव्वद कोटी रुपये खर्च करायला पैसे आहेत, दारुची अनुज्ञप्ती द्यायला पैसे आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडे पैसे नाहीत ही नाटकं बंद करावीत.”
देवेंद्र फडणवीस पुण्यात भाजप आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलाताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदींची विम्याची योजना आहे. राज्य सरकारने 4 वर्षे ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने लागू केली. आपण शेतकऱ्यांकडून 100-200 कोटी रुपये घेतले आणि त्या बदल्यात विम्यापोटी 4000 कोटी रुपये दिले. आता मात्र, एक नव्या पैशाचा विमा शेतकऱ्याला मिळू शकत नाही. कारण या सरकारने एक प्रकारे ती विमा योजनाच बासणात गुंडाळली. या योजनेचे टेंडर देखील होऊ शकले नाही,” असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं.
“केळीबाबतही विशेष निकष तयार केले होते. यात केळीचा विमा कसा उतरवावा याचे नियम ठरवण्यात आले. आपण त्या नियमांवर टेंडर काढून विमा कंपनी नेमली. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विमा मिळाला,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.
हेही वाचा :
भाजप नेते शहाजी पवार यांच्या मुलीच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
फडणवीस सरकारने एसईबीसी कायदा करुन मराठ्यांची फसवणूक केली : प्रवीण गायकवाड
चीनची गुंतवणूक महाराष्ट्रात यायला हवी: देवेंद्र फडणवीस
संबंधित व्हिडीओ पाहा :
Devendra Fadnavis criticize Thackeray Government of Farmer Policy in Pune