सिंधुदुर्ग : “भाजप नेते नारायण राणेंच्या पनवतीमुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली. त्या नारायण राणेंनी ती सावरता येते का हे पाहावं”, असा टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंना (Vinayak Raut Criticizes Narayan rane) लगावला.
“नारायण राणेंची दखल घेण्याची आवश्यकता नाही. ज्या नारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांचा गाडी घसरली. त्या नारायण राणेंना ती सावरता येते का हे त्यांनी पाहावं अन्यथा त्यांनी स्वत:चा विचार जरुर करावा.” असेही विनायक राऊत (Vinayak Raut Criticizes Narayan rane) म्हणाले.
“ज्याने आयुष्यभर ठेकेदारी केली. दमदाटी करुन पैसे उकळण्याचे काम केले. चेंबूरच्या नाक्यावर बसून कोंबडी कापता कापता महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद बाळासाहेबांच्या कृपेने मिळाले. त्या नारायण राणेला आता त्यांच्या अज्ञातवासामध्ये त्यांचा भूतकाळ आठवतो आहे. त्यामुळे कोंबड्या कशा कापल्या, लोकांना कसं फसवलं, चिटींग कशी केली हे सर्व आठवत असताना त्यांची बडबड, मुक्ताफळ सुरुच असतात. त्यामुळे आम्ही त्यांची दखल घेत नाही.” असा टोलाही राऊतांनी राणेंना (Vinayak Raut Criticizes Narayan rane) लगावला.
“नारायण राणेंना त्यांची जागा कोकणातील जनतेने दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांनी वनवासात जावं आणि शेवटचं आयुष्य हरि नामामध्ये मार्गक्रमण करावे.” असेही ते म्हणाले.
“कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. त्यामुळे राणेंच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारला कोणतीही बाधा होणार नाही. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार हे एक आदर्श सरकार बनेल. त्याचे अनुकरण आतापासून अनेक ठिकाणी सुरु आहे. त्यामुळे नक्कीच आम्ही त्या सरकारकडे अभिमानाने पाहतो आहे.” असेही विनायक राऊत (Vinayak Raut Criticizes Narayan rane) म्हणाले.