मुंबई: देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाला आहे. फडणवीसांनी त्यामधून लवकर बरे व्हावे, असा सदिच्छा आम्ही देतो. कारण, आम्हाला लढण्यासाठी समोर तगडा पैलवान पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. कुणी कितीही चिखलफेक केली तरी आमचं सरकार पाच वर्ष टिकणारच. आम्ही जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळे राज्यातील जनतेचे आशीर्वाद आमच्या पाठिशी असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. (Sanjay Raut give wishes to recover Devendra Fadnavis to recover form coronaviurs)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी संजय राऊत यांनी आपल्या भाषणात भाजपला चिमटे काढले. मी दरवेळी दिल्लीत जातो तेव्हा महाराष्ट्रातील सरकार पडणार, अशी चर्चा असते. महाराष्ट्र सरकार पाठवण्यासाठी 200 कोटी रुपये पाठवण्यात आलेत, असे सांगितले जाते. परंतु, 200 कोटी रुपये सांगून महाराष्ट्राची इज्जत काय घालवताय? एवढ्या रक्कमेचे व्यवहार तर महाराष्ट्रातील नगरपालिकेच्या राजकारणात होतात. त्यामुळे महाराष्ट्राची पत ओळखून किमान 2000 कोटींचे वैगेरे आकडे सांगावेत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी विरोधकांची खिल्ली उडविली.
तसेच शिवसेनेची भविष्यातील वाटचाल ही भव्यदिव्य असेल. गेल्यावर्षी याच दिवसात युद्धाला प्रारंभ झाला. आपण महाराष्ट्रात असत्यावर विजय मिळवून आजचा महाविजयादशमी मेळावा साजरा करत आहोत. त्यामुळे आता यापुढे शिवसेनेच्या आयुष्यात ‘महा’राष्ट्र, ‘महा’विकासआघाडी अशा महा (मोठ्या) गोष्टीच घडतील, असेही त्यांनी सांगितले.
‘देवेंद्र फडणवीस सरकारी रुग्णालयांवर विश्वास दाखवण्यासाठी सेंट जॉर्जमध्ये दाखल’
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सध्या त्यांच्यावर सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोना संसर्ग झाला तर सरकारी रुग्णालयात दाखल करा, असं देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यांपूर्वी सांगितले होते. तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारमधील कोरोना संसर्ग झालेले मंत्री खासगी आणि कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये दाखल झाले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द पाळत सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात दाखल होणे पसंत केले.
हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आव्हान
काही लोकांना सत्तेचे स्वप्न पडत आहेत. अनेक दिवसांपासून सत्ता पाडण्याचं ऐकत आहे. हिंमत असेल तर सरकार पाडा, आम्ही तुमच्या सारखे गुळाच्या ढेपेला चिटकलेले मुंगळे नाहीत. वाटेला जाल तर काय ते दाखवून देऊ, असं थेट आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना दिलं.
राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा होता. त्यामुळे या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय राजकीय भाष्य करणार याकडे संपूर्ण देशाचे लागले होते. अपेक्षेनुसार उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तडाखेबंद भाषणातून विरोधकांची पिसे काढली.
संबंधित बातम्या:
बेडूक आणि त्याची पिल्लं वाघ पाहून ओरडत सुटलेत; उद्धव ठाकरेंचा राणे कुटुंबीयांवर सॉल्लिड प्रहार
भाजपवाल्यांनो भाडोत्री बाप तुम्हालाच लखलाभ असो, माझा बाप हा महाराष्ट्र- उद्धव ठाकरे
(Sanjay Raut give wishes to recover Devendra Fadnavis to recover form coronaviurs)