देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण, होम आयसोलेशनमध्ये उपचार

| Updated on: Jun 05, 2022 | 1:05 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण, होम आयसोलेशनमध्ये उपचार
कोरोना होऊनही फडणवीस म्हणतात "मै झुकेगा नहीं", अश्विनी वैष्णव यांच्यासोबतच्या बैठकीत ऑनलाईन उपस्थिती
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची (Corona)लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र काळजी करण्याचे काही कारण नाही. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये (Home isolation)असून, घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेत आहे. माझ्या जे संपर्कात आले आहेत, त्यांनी देखील कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी देखील एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले होते. आता पुन्हा एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान फडणवीस यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी आपले सर्व राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत.

 

हे सुद्धा वाचा

कोरोना चाचणी करण्याचे आवाहन

देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. सध्या देवेंद्र फडणवीस हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. माझा कोव्हिड 19 चाचणीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. सध्या मी होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेत आहे. माझ्या संपर्कात गेल्या दोन -तीन दिवसांमध्ये जी लोक आली होती, त्यांनी देखील कोरोना चाचणी करून घ्यावे असे आवाहन करणारे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस यांना कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी देखील एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली होती, तेव्हा त्यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले होते. यावेळी त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने फडणवीस यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

दरम्यान काही दिवसांपूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरे यांचा देखील दुसऱ्यांदा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. राज ठाकरे यांच्या पायावर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार होती. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.