नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा जवाब आज पोलिसांनी त्यांच्या सागर बंगल्यावर नोंदवला. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अशावेळी माजी ऊर्जामंत्री आणि भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी तर महाविकास आघाडीला थेट इशाराच देऊन टाकलाय. ‘महाराष्ट्र अशांत करण्याचा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचा घाट आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांची चोकशी करायची सोडून राज्य सरकारने आमचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस पाठवली, हे कृत्य चुकीचे आहे. पोलिसांनी तात्काळ नोटीस परत घ्यावी. देवेंद्र फडणवीस यांनी एकच बॉम्ब फोडला असून, त्यांच्याकडे असे अनेक शस्त्र आहेत. येणाऱ्या काळात ते बाहेर निघतील, असा दावाही बावनकुळे यांनी केलाय.
पोलिसांच्या बदली संदर्भातला अहवाल लिक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना चौकशीची नोटीस पाठवली. त्याच नोटिशीचा निषेध करण्यासाठी रविवारी नागपुरातील हजारो भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात यावेळी नोटिशीची होळी करण्यात आली. या आंदोलनाला प्रामुख्याने खासदार विकास महात्मे, माजी मंत्री अनिल बोंडे, भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण दटके, नागपूर ग्रामीण अध्यक्ष अरविंद गजभिये, आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार गिरीश व्यास, प्रदेश सदस्य डॉ. राजीव पोतदार, महामंत्री अविनाश खळतकर, शहर भाजपा युमोचे अध्यक्ष पारेन्द्र पटले, ग्रामीण भाजपा युमोचे अध्यक्ष आदर्श पटले, विशाल भोसले, संजय फांजे उपस्थित होते.
महाविकास आघाडीचा भ्रष्टाचारी चेहरा आम्ही जनतेसमोर आणल्याशिवाय शांत बसणार नाही. आज मा. @Dev_Fadnavis जी यांना समर्थन देण्यासाठी व्हेरायटी चौकात आम्ही पोलिसांच्या नोटिसीची होळी पेटवली @PravinDatke @krishnakhopde @DoctorAnilBonde @GirishVyasBJP #ISupportDevendra pic.twitter.com/bqDeK374NM
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) March 13, 2022
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी उघड केलेल्या पोलीस बदल्यांच्या घोटाळ्याचा राज्य सरकारने तपास करावा. माहितीचा स्रोत विचारण्यापेक्षा ती खरी की खोटी याची चौकशी करावी आणि दोषी मंत्र्यांवर कारवाई करावी. नोटीस पाठवून देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्य सरकारने दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. हे चुकीचे आहे. अशा दबाव तंत्राने भाजपाचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत. आम्ही महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेपर्यंत पोहोचून राज्य सरकारचा भ्रष्टाचारी चेहरा उघड करू.
मा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जी यांना पोलिसांकडून नोटीस पाठवून राज्य सरकाने सूड उगविण्याचा प्रयत्न केला. आम्ही गप्प राहू असे राज्य सरकारला वाटत असेल तर सरकार संभ्रमात आहे. #ISupportDevendra @Dev_Fadnavis https://t.co/un8oMgOr2a
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) March 13, 2022
विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सरकार मधील भ्रष्टाचार आणि नियमबाह्य गोष्टी बाहेर आणण्याचा घटनात्मक अधिकार आहे. त्याच अधिकारान्वये देवेंद्र फडणवीस माहिती विधिमंडळात आणि जनतेसमोर मांडत असल्याचे बावनकुळे म्हणाले.
इतर बातम्या :