मुंबई : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी (Deputy CM Devendra Fadnavis) विराजमान झाले. त्यानंतर अनेकांनी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकावले. संपूर्ण राज्यभरात देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदनपर पोस्टर लावण्यात आले होते. अशातच मीरा भाईंदरमध्ये भाजप समर्थकांनीही बॅनरबाजी केली होती. पण ही बॅनरबाजी चांगलीच चर्चेत आली आहे. कारण या बॅनरमध्ये (Devendra Fadnavis News) देवेंद्र फडणवीस यांचं नाव छापतानाच मोठा घोळ झाला. मीरा रोडच्या शांतीनगर येथील जैन मंदिर परिसरात लावलेला बा बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते. या बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फर्नांडिस (Devendra Fernandes Poster) असा करण्यात आला होता. स्वीकृत नगरसेवक विक्रम प्रतापसिंह यांनी फडणवीसांना शुभेच्छा देताना त्यांचं आडनाव फडणवीस ऐवजी फर्नांडिस केल्यानं हा बॅनर चर्चेचा विषय ठरलाय.
देवेंद्र फडणवीस यांनी 2019 नंतर 80 तास मुख्यमंत्रीपद सांभाळलं, त्यानंतर महाविकास आघाडी सरकार उदयाला आला. मागच्या अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेते पद भूषवलं. त्यानंतर आता बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन करताना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असतील, ही घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली होती. त्यानंतर त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता.
देवेंद्र फर्नांडिस ??
धर्म बदललाय की काय??? pic.twitter.com/bVrT2x4keV— Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ Ṩḣäṃḃḣäṝќäṝ (@Namrata_Uikey_) July 5, 2022
लॉर्ड देवेंद्र फर्नांडिस ? pic.twitter.com/JQiOHrFtwB
— Baba MaChuvera ? (@indian_armada) July 6, 2022
सोशल मीडियातही भाईंदरचा हा बॅनर आता चर्चेत आला आहे. अनेकांनी या बॅनरवरुन देवेंद्र फडणवीस आणि भाजप समर्थकांवर निशाणा साधलाय. प्रताप फाऊंदेशन परिवार यांच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला होता. विक्रम प्रतापस सिंह हे तिथले स्थानिक नगरसेवक आहेत. या बॅनरमधून एकनाथ शिंदे यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.