मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची मुलाखत छापून आली आहे. शिवसेनेतील (shivsena) बंडानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच प्रदीर्घ मुलाखत आहे. या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर चांगलच तोंडसुख घेतलं आहे. त्यामुळे सकाळपासूनच या मुलाखतीवरून प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे. मी फिक्स मॅच पाहत नाही. मी लाईव्ह मॅच पाहत असतो. खरी मॅच पाहत असोत. पण जी फिक्स मॅच आहे, ती पाहून त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची? काही दिवासांनी काही गोष्टी येतील तेव्हा पाहू. तेव्हा देऊ प्रतिक्रिया देऊ, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केली आहे. मीडियाशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहेत. तसेच काँग्रेसचे आंदोलन निरर्थक आहे. आम्हीही काही तरी केलंय. आम्हीही तुमच्या पाठी आहोत. भविष्यात आम्हालाही काही तरी द्या. एवढंच सांगण्यासाठी ते आंदोलन आहे. बाकी त्यात काही नाही. त्यामुळे त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं फडणवीस म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचा निधी रोखल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी संभाजी महाराजांच्या समाधी संबंधित कामांवर स्थगिती दिल्याचा आरोप केला आहे. या कामांना कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. दादांसारख्या व्यक्तीने तरी असा आरोप करताना फाईलवर काय लिहिलंय हे पाहिलं पाहिजे. मी स्वत: माझ्या हस्ताक्षरात लिहिलंय की या कामाला स्थगिती देणं योग्य होणार नाही. उलट या संदर्भात काय काय कामे घेतली त्याचं सादरीकरण माझ्या आणि मुख्यमंत्र्यांसमोर करावं. त्यात काही काम राहिली असतील तर तीही घेतली जाईल, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
आदित्य ठाकरे यांच्या खात्यातील कामांचा आढावा घेतला जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. केवळ आदित्य ठाकरेंच्या खात्याच्या प्रकल्पाचाच नाही अल्पमतात असताना मागच्या सरकारने 400 जीआर काढले होते. ते काढायला नको होते. पैसे नसताना चारपट निधीचं वाटप केलं, त्याची चौकशी सुरू आहे. असं चाललं तर सरकारला फटका बसेल. सर्व खात्याचा रिव्ह्यू केला जात आहे. एका व्यक्तीचा किंवा खात्याचा रिव्हूय नाही. एकट्या पर्यटन विभागाची समीक्षा नाही. एकूणच सिस्टिमचा रिव्ह्यू करत आहोत. सरकारला भट्टा बसेल, सरकारच्या तिजोरीवर भार येईल. म्हणून आम्ही समीक्षा करत आहोत, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी पावसाचा आढावा घेतला आहे. आम्ही अजून आढावा घेणार आहोत. आमच्याकडे अहवाल येत आहेत. एकदम सर्वांना मदत करायची आहे. त्यामुळे सर्व पाहून निर्णय घेऊ. अजित दादांच्या सरकारपेक्षाही चांगला निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं.