मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis informal chat) यांनी अनौपचारिक गप्पादरम्यान, अनेक औपचारिक बाबी पत्रकारांसोबत शेअर केल्या. सत्तास्थापनेचा मुहूर्त, सत्तेचं गणित, शिवसेनेसोबत ठरलेले वादे, मुख्यमंत्री कोण याबाबतची माहिती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis informal chat) यांनी दिली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपणच पुढील 5 वर्ष मुख्यमंत्री असू, असं थेट सांगितलं. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर दावा सांगणाऱ्या शिवसेनेला हा रोखठोक इशारा आहे. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासाठी अडीच अडीच वर्षांचा असा कोणताही फॉर्म्युला ठरला नाही, असंही सांगितल्याने, लोकसभेपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युल्याचा दाखला देणाऱ्या शिवसेनेला भाजपने तोंडावर पाडलं आहे.
मुख्यमंत्र्याच्या गप्पांमधील महत्त्वाचे मुद्दे
1) मी5 वर्ष मुख्यमंत्री राहील याबाबत काही शंका नाही. अडीच-अडीच वर्षाचा मुख्यमंत्री असा कोणताही ठराव नाही
2) सेनेला पाचही वर्ष मुख्यमंत्रीपद पाहिजे वाटू शकेल, पण वाटणं आणि होणं यात फरक
3) सेनेकडून मुख्यमंत्री पदाची मागणी आली होती मात्र त्यांना कोणताही आश्वासन दिलं नाही. आम्ही कोणताही फॉर्म्युला घेऊन चाललो नाही
4) शिवसेना कोणताही पर्याय शोधत नाही. मंत्रीपदाबाबत सेनेकडून कोणतीही मागणी आलेली नाही
5) आम्ही लवकरच सरकार स्थापन करु, काहीही बातम्या आल्या तरी सरकार आमचंच असेल
6) काँग्रेस राष्ट्रवादीने सेनेसोबत जाऊ असं म्हटलं नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देईल असं कधीही म्हणाले नाहीत, आम्हीच शिवसेनेसोबत जाऊ
7) आदित्य ठाकरे काय बनतील हे शिवसेना ठरवेल. सामनावर आमची नाराजी आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याविरोधात तर असं लिहून पहा
8) आम्ही फर्स्ट क्लासमध्ये आलो आहे, पण आमच्या मेरिटबद्दल कोणच बोलत नाहीत.
9) शपथविधीचा मुहूर्त लवकरच कळेल. आतमध्ये काय आहे हे तुम्हाला माहीत नाही. लवकरच फॉर्म्युला कळेल
10) अमित शाह उद्या येणार नाहीत. अधिकृत आणि अनधिकृत आमच्या बैठका सुरू आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या अनौपचारिक गप्पांमधील मुद्दे