Devendra Fadnavis : नगराध्यक्ष थेट लोकांमधून निवडण्याचा निर्णय का घेतला?; फडणवीसांचं कारण देत काँग्रेस, राष्ट्रवादीवर बोट

| Updated on: Jul 16, 2022 | 12:50 PM

Devendra Fadnavis : तसेच लवकरच पालकमंत्री होईल. त्यांना जसं वाटतं तशी अडचण नाहीये. विरोधी पक्षनेत्याला तसा विरोध करायचाच असतो. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरं देण्याची गरज नाही, असा टोला शिंदे यांनी अजित पवार यांना लगावला.

Devendra Fadnavis : नगराध्यक्ष थेट लोकांमधून निवडण्याचा निर्णय का घेतला?; फडणवीसांचं कारण देत काँग्रेस, राष्ट्रवादीवर बोट
नगराध्यक्ष थेट लोकांमधून निवडण्याचा निर्णय का घेतला?; फडणवीसांचं कारण देत काँग्रेस, राष्ट्रवादीवर बोट
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या सरकारने नगराध्यक्ष थेट लोकांमधून निवडण्याचा निर्णय घेतला. मागच्या सरकारने लोकप्रतिनिधींमधून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला होता. शिंदे-फडणवीस यांनी सत्तेत येताच हा निर्णय फिरवला. त्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही काँग्रेसच्या टीकेचा समाचार घेतला आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून दिल्यास पैशाची खेळी करता येत नाही हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी निर्णय फिरवला होता. आम्ही जेव्हा नगराध्यक्ष जनतेतून निवडून घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा आमचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने (ncp) आमचा निर्णय फिरवला होता. देशात सर्वच ठिकाणी नगराध्यक्ष लोकांमधून निवडून येतो. महाराष्ट्र पुरोगामी राज्य असूनही मागे होतं. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी महापौरही जनतेतून निवडून येतो. अर्थात आमच्यासमोर तसा प्रस्ताव नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीस बोलत होते. राज्यात पालकमंत्री कधी नेमले जाणार? मंत्री कधी शपथ घेणार असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. त्यावरही फडणवीस यांनी उत्तर दिलं. त्यांची लाईन डेड आहे. म्हणून त्यांना डेडलाईन हवी आहे. त्याची चिंता करू नका, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

डिसले गुरुजींना न्याय मिळेल

डिसले गुरुजींचं म्हणणं मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतलं आहे. ज्या शिक्षकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्यांच्या बाबत चुकीचं काम होऊ नये त्यांना त्रास होऊ नये म्हणून सूचना दिल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

राऊतांना रोज एकच काम असतं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांना टोला लगावला. ते रोज सकाळी उठून त्यांना तेच काम असतं. मला तेवढंच काम नाही. आम्ही पूरपरिस्थितीची पाहणी करतोय. बाजूच्या राज्यांशी बोलतोय. तेलंगना, आंध्रशी बोलतोय. गडचिरोली, विदर्भात जाऊन पाहणी करतोय. आम्ही इंधन दर कमी केले आहे. मंत्रिमंडळ लवकरच होईल. त्यात काय अडचण आहे, असं शिंदे म्हणाले. तसेच लवकरच पालकमंत्री होईल. त्यांना जसं वाटतं तशी अडचण नाहीये. विरोधी पक्षनेत्याला तसा विरोध करायचाच असतो. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरं देण्याची गरज नाही, असा टोला शिंदे यांनी अजित पवार यांना लगावला.