नवी मुंबई : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis Visit Navi Mumbai Corona Pandemic) एमएमआर क्षेत्रातील कोविडच्या तयारीचा आढावा घेतला. “कोरोना काळात तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. पण तसं दिसत नाही. किमान निर्णय प्रक्रियेतून तरी तसं दिसून आलं पाहिजे,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांवर केली.
“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रदीर्घ अनुभव आहे. ते आम्हाला अनेकदा सूचना करायचे. त्याचप्रमाणे सरकारलाही ते सूचना करत असतील. त्यामुळे त्या सूचनांची अंमलबजावणी कशी करायची हे मुख्यमंत्र्यांनी ठरवायचे आहे,” असेही ते म्हणाले.
गेल्या महिन्याभरात कोविडची संख्या वाढत आहे. कोरोनाचा दुपटीचा दर वाढत असला तरी संख्या वाढत आहे. त्यामुळे शासकीय व्यवस्थेमध्ये कोरोना रुग्णांसाठी जागा उरलेली नाही. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावं लागत आहे. त्याठिकाणी त्यांना मोठे दर द्यावे लागत आहे. सर्व सामन्यांना ते दर परवडत नाही. त्यामुळे सर्वांना महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
त्याशिवाय जनरल हॉस्पिटल कोव्हिडसाठी असल्यामुळे आता नॉन कोव्हिडला सुद्धा आरोग्य सुविधा मिळलायला हवी. सध्या टेस्टिंगचे प्रमाण प्रचंड कमी आहे. कोरोना संक्रमणाचा दर हा 30 टक्के आहे. त्याचा अर्थ आता टेस्टिंगची मोठ्या प्रमाणात गरज आहे. जर टेस्टिंग वाढवलं नाही, तर संक्रमण वाढत जाईल, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
आयसीएमआरने टेस्टिंग झालं पाहिजे, अशी सूचना केली आहे. तसेच नवी मुंबईत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एपीएमसी मार्केटमध्ये रॅपिड टेस्टिंग करा, अशी मागणी फडणवीसांनी (Devendra Fadnavis Visit Navi Mumbai Corona Pandemic) केली.
येत्या काळात अधिक आय सी यू आणि व्हेंटिलेटरवर उपलब्ध करावे लागतील. शासनाकडून खरेदीची प्रक्रिया अत्यंत मंद गतीने सुरु आहे, ती वेगाने केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
“वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त्यांच्या बदल्या करणे ही योग्य पद्धत नाही. या लढाईत सातत्य गरजेचे आहे. सरकार आयुक्त बदलून सरकारचं अपयश आयुक्तांच्या माथी मारु पाहत आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री आहेत. मात्र त्यांना सुद्धा आयुक्त बदली करत असताना विश्वासात घेतले गेले नाही,” अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केली.
“गाडी घेणे ही प्राथमिकता असू शकत नाही. एकीकडे कर्मचाऱ्यांना द्यायला पगार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत कडक धोरण स्वीकारले पाहिजे,” असेही फडणवीस म्हणाले.
“संपूर्ण कोव्हिडच्या काळात मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यात विरोधी पक्षाची बैठक बोलावली नाही. त्यात ही भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. त्या पक्षाच्या अध्यक्षांना बोलावले नाही. आमच्यात कोणता ही इगो नाही. आम्ही सरकारला मदत करायला तयार आहोत. जर मदत मागितली नाही तरी ही आम्ही मदत करुच. कारण आम्ही जनतेला बांधील आहोत,” असेही फडणवीस यावेळी (Devendra Fadnavis Visit Navi Mumbai Corona Pandemic) म्हणाले.
In Navi Mumbai, visited #COVIDー19 hospital, quarantine centre at CIDCO exhibition centre and then reviewed situation with officials at Navi Mumbai Municipal Corporation with @mipravindarekar, Ganesh Naik ji and my other colleagues this afternoon. #CoronaInMaharashtra pic.twitter.com/6Jev6F4pK7
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 4, 2020
संबंधित बातम्या :
थोडेसे मतभेद असतात, पण आम्ही पूर्ण ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी उभे : जितेंद्र आव्हाड
कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि आदित्य ठाकरेंसोबत शरद पवारांची तासभर चर्चा