मुंबई : येत्या एक मेपासून देशातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस घेण्याची मुभा मिळाली आहे. परंतु विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या तरुण पुतण्याने आधीच लस घेतल्यामुळे सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस (Tanmay Fadnavis) लस घेतानाचे फोटो व्हायरल झाल्यामुळे टीकेची झोड उठली आहे. (Devendra Fadnavis young nephew Tanmay Fadnavis gets Corona Vaccine Social Media ask eligibility)
रेमडेसिव्हीरच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं असतानाच आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने हल्लाबोल चढवला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांनी तो काही वेळात डिलीटही केला. मात्र त्याआधी त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. तन्मय यांचे वय 45 वर्षांपेक्षा अधिक नाही, ते फ्रंटलाईन वर्कर नाहीत, मग त्यांना कोरोनाची लस कशी मिळाली, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. चाचा विधायक है हमारे या प्रसिद्ध विनोदी सीरीजच्या नावावरुनही काही जणांनी टीका केली आहे.
“Chacha Vidhayak Hain Humare” pic.twitter.com/0qMR5cCiyp
— Nimo Tai 2.0 (@Cryptic_Miind) April 19, 2021
कोण आहेत तन्मय फडणवीस?
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे
माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू
अभिनेता असल्याचा ट्विटरवर उल्लेख
नागपुरातील पब्लिक फिगर असे इन्स्टाग्राम बायोमध्ये मेन्शन
काँग्रेसचा हल्लाबोल
“45 वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे. असं असताना फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय कीडे मुंग्या आहेत का? त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का!” असा सवाल काँग्रेसच्या ट्विटर अकाऊण्टवरुन करण्यात आला आहे.
“तन्मय फडणवीस 45 वर्षांपेक्षा मोठा आहे का? फ्रंटलाईन वर्कर आहे का? आरोग्य कर्मचारी आहे का? भाजपकडे रेमडेसिव्हीरप्रमाणे लसींचाही गुप्त साठा आहे का?” असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत. आता जनतेच्या प्रश्नावर फडणवीस मौन सोडणार का, हा सवाल विचारला जात आहे.
४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?
भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का! pic.twitter.com/oN49h5xiiC
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 19, 2021
संबंधित बातम्या :
मोठी बातमी: देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार
(Devendra Fadnavis young nephew Tanmay Fadnavis gets Corona Vaccine Social Media ask eligibility)