मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून अभिनंदनाच्या प्रस्तावाचं भाषणात त्यांनी केलं. त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं तोंडभरून कौतुक केलं. शिवसेना भाजप युतीचे आमचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला. याबाबत मी शिंदे यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. त्यानंतर सभागृहात इतरांकडून जल्लोष करण्यात आला. महाविकास आघाडीच्या (MVA) काही लोकांनी माझी टिंगल टवाळी केली. परंतु मी माझं काम कधीचं थांबवलं नाही. त्यानंतर त्यांनी मला माझ्या पक्षाने घरी जरी बसवलं असतं. तरी मी माझ्या घरी बसलो असतो. कारण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची टिंगल केली होती. आजच्या भाषणात फडणवीसांनी त्यांच्या शैलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उत्तरे दिली आहेत.
मविआ सरकार अनैसर्गिक आहे. ती अधिककाळ टिकणार नाही. मी कविता म्हटली होती की मी पुन्हा येईन, त्यावरही माझी टिंगल उडवली. पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो. एकटा नाही आलो, यांना सोबत घेऊन आलो असा टोला देखील त्यांनी उपस्थितांना लगावला. ज्यांनी माझी टिंकल टवाळी केली. त्यांचा मी बदला घेणार आहे. बदला हा आहे, की मी त्यांना माफ केलंय. प्रत्येकाची वेळ येते. त्यानंतर फडणवीसांनी दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, काच के खिलोने हवा मे उछाले नहीं जाते. कोशिश करने से हर मुश्लिल होती है आसान, तकदीर के भरोसे काम टाले नहीं जाते. असा डायलॉग त्यांच्या शैलीत मारला.
राज ठाकरेंनी अतिशय मला सुंदर पत्र लिहिलं आहे. त्यांना उत्तर द्यायचा विचार केला. पण मला शब्द सुचले नाहीत. फोनवरुन मी त्यांचे आभार मानले. लवकरच त्यांची भेट घेणार आहे. त्यांची तब्येत अजून बरी नाही आहे. आपण एकमेकांचे राजकीय विरोधक आहोत. एकमेकांचे सत्रू नाही असंही त्यांनी बोलून दाखवलं. हे सरकार पण ईडीचे आहे, एकनाथ आणि देवेंद्र त्यानंतर सभागृहात जल्लोष झाला. आमच्या नेत्यांवर 30-30 केस टाकल्या होत्या.
माझी गाडी देवदर्शनाला भाड्याने नेली आणि 5000 दिली नाही, यावरुन केस केली असं उदाहरण देखील त्यांनी आपल्या भाषणात दिलं.