लातूर : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना प्रेमानं त्यांचे कार्यकर्ते धनुभाऊ म्हणतात. याच धनुभाऊंचा दिलखुलास अंदाज एका लग्नात पाहायला मिळाला आहे. लग्नात नवरा नवरीसोबत वरातीत धनुभाऊ थिरकले. यावेळी त्यांच्या भन्नाट स्टेप्स पाहून उपस्थितांनी एकच जल्लोष केलाय. धनुभाऊंनी या लग्नात केलेला डान्स सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला असून बेभान होऊन धनंजय मुंडे लग्नाच्या वरातीचा आनंद घेताना दिसले आहेत. सर्वसामान्य माणसाप्रमाणे लग्नाच्या वरातीत उत्साहानं नाचणारा एक जण असतोच. या लग्ना ती व्यक्ती म्हणजे धनंजय मुंडेच होती की काय, असा प्रश्न तुम्हाला त्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ (Viral Video of Dhananjay Munde) पाहून होऊ शकतो. आपल्या नेहमीच्या शालीन, शांत अशा स्वभावाला एकदम छेद देत धनुभाऊंनी केलेला डान्स पाहून त्यांचे चाहत्यांना त्यांना ‘सुपर से उपर’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
धनंजय मुंडे यांनी या लग्नात ज्या वेशात ठेका धरला, तेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारंच होतं. साध्या सफेद रंगाच्या ट्रॅक स्वेट जॅकेटवर धनंजय मुंडे निळी ट्रॅक पॅन्ड परिधान केलेल्या धनंजय मुंडेनी या लग्नाच्या डिजेमध्ये आपल्या स्पेशल परफॉर्मन्स दिलाय. डॉन गाण्यावर धनंजय मुंडे यावेळी थिरकताना दिसलेत. अरे दिवानो.. मुझे पेहचानो, कहाँ से आया मे हू डॉन या गाण्याच्या रिमिक्स वर्जनवर धनंजय मुंडे बेभान होऊन नाचत असल्याचं व्हिडीओमध्ये कैद झालंय.
धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळच्या नात्यातला विवाह असल्यानं धनंजय मुंडे सकाळपासूनच या लग्नाला हजर होते. तर दुपारच्या सुमारात पंकजा मुंडेही या लग्नाला उपस्थित झाल्या होत्या. दरम्यान, लग्नाच्या वरातीत मात्र धनंज मुंडे यांनी दिवसभराचा लग्नाचा सगळा क्षीण बाहेर काढल्याची चर्चा रंगली आहे.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे भाची तेजश्री वामनराव केंद्रे यांच्या विवाहानिमित्त उपस्थित राहिले होते. दोघांनीही नवदांपत्यांना शुभाशीर्वाद दिला. एवढंच नाही तर विवाहस्थळी दोघाही बहीण भावांनी एकमेकांच्या हाताला जोरदार टाळी दिली.
धनंजय मुंडे याचा लग्नातला डान्स व्हायरल.. भाऊ.. भाऊ.. काय नाचलाय भाऊ…! pic.twitter.com/jWRVez4nTW
— Siddhesh Sawant (@ssidsawant) February 7, 2022
Special Report | बीडमध्ये खुद्द आमदार संदीप क्षीरसागर यांना झाडावर का चढावं लागलं?