बीड : आपल्या लाडक्या नेत्याच्या स्वागतासाठी कोण काय करेल याचा काही नेम (dhananjay munde felicitation beed) नाही. असाच एका बीडच्या कार्यकर्त्याने सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी चक्क नेत्याच्या वजनाच्या दुपटीचा हार घालून भव्य स्वागत केलं. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झाले. त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. नेत्यावर निष्ठा ठेवत एका कार्यकर्त्यांने धनंजय मुंडे यांच्या वजनाच्या दुप्पट इतकं हार तयार करुन त्यांचा अनोखा स्वागत केलं.
धनंजय मुंडे हे काल (9 जानेवारी) भगवान गडावर पहिल्यांदाच मंत्री म्हणून दर्शनासाठी गेले होते. याचे औचित्य साधून सौरभ आघाव या कार्यकर्त्याने आपल्या मित्रासोबत तब्बल 174 किलोचा हार बनवला. याच हारातून साहेबांचं अनोखं स्वागत करत त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सौरभ हा सहावीत असल्यापासून धनंजय मुंडे यांचा फॅन आहे. आपला आवडता नेता मंत्री झाल्याने आनंद द्विगुणीत करण्यासाठी सौरभने त्याच्या मित्राला सोबत घेऊन तब्बल 174 किलोचा हार बनवला.
एवढा मोठा वजनाचा हार बनवण्यासाठी सौरभने शेख सलीमची मदत घेतली. या फूलवाल्याची शेख सलीम गेल्या 40 वर्षांपासून फुलांचा व्यवसाय करतात. मात्र पहिल्यांदाच त्यांच्याकडे तब्बल 144 किलोचा हार तयार करण्याची मागणी आली आहे. ही फूल अहमदनगर मागवण्यात आले आहेत. या एवढा मोठा हार बनवण्यासाठी तब्बल 9 ते 10 तास सलीम यांनी घातले.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी *भगवान गडावरील* तयारी pic.twitter.com/TSG2qurfme
— OfficeofDM (@OfficeofDM) January 9, 2020
महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय व विशेष न्याय मंत्रिपद मिळाले. बीडचे पालकमंत्री असं परत मिळाला आहे. धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच मंत्री होऊन बीड जिल्ह्यात परतल्यामुळे अनेक ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते आणि चाहते रस्त्यावर उतरले. मात्र सौरभने केलेल्या अनोख्या स्वागताची चर्चा संपूर्ण बीड जिल्ह्यात लक्ष वेधून (dhananjay munde felicitation beed) घेतले.