बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी गहिनीनाथ गडावर (Gahininath Gad) महापूजा केली. त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही गहिनीनाथ गडावर उपस्थिती लावली. यावेळी मुंडे बहीण-भावाला एकाच व्यासपीठावर पाहण्याचा योग आला. संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गडावर महापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. (Dhananjay Munde Performs Pooja at Gahininath Gad with Pankaja Munde)
धनंजय मुंडेंनी गहिनीनाथ गडावर जाण्याची परंपरा अनेक वर्षांपासून अखंडितपणे सुरु आहे. यंदा ते मंत्री तर आहेतच, मात्र वैयक्तिक आयुष्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळेही ते चर्चेत आहेत. यावेळी गडाचे महंत ह. भ. प. विठ्ठल महाराज शास्त्री यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी वैराग्यमूर्ती संत श्री वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त गहिनीनाथ गड आयोजित महापूजेस उपस्थित राहिलो. संतांच्या केवळ दर्शनाने ईश्वरप्राप्ती होते, संत दर्शनाचा हा लाभ असतो. गेली अनेक वर्षे मी हा लाभ घेत आहे व अखंडितपणे घेत राहीन… pic.twitter.com/Y4YxWFEE5f
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 5, 2021
शनिदेवाचा अभिषेक
धनंजय मुंडे यांनी 30 जानेवारीला सकाळी शनी शिंगणापूरच्या मंदिरात शनी देवाचा अभिषेक केला होता. धनंजय मुंडेंनी आपल्यामागील साडेसाती संपावी म्हणून शनी शिंगणापुरात शनी देवाला अभिषेक केला, अशी जोरदार चर्चा रंगली होती. धनंजय मुंडे एका मोठ्या संकटातून बाहेर पडत असल्याचं त्यांच्याच देहबोलीवरुन जाणवत होतं. त्यातून पूर्ण मुक्त होण्यासाठीच ते शनी देवाच्या चरणी गेल्याचं दिसलं. (Dhananjay Munde Performs Pooja at Gahininath Gad with Pankaja Munde)
दोन दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधात करुणा शर्मा या महिलेने गंभीर आरोप केले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
धनंजय मुंडेंचा जनता दरबार
धनंजय मुंडे दुपारी अडीच वाजल्यापासून बार्शी रोड येथील राष्ट्रवादी भवन जनता दरबारात कार्यकर्ते आणि नागरिकांची भेट घेणार आहेत. त्यानंतर बार्शी रोड येथील भगवानबाबा प्रतिष्ठान येथे भेट आणि काही नियोजित भेटीगाठी आटोपून ते परळीकडे रवाना होणार असल्याचे धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
धनंजय मुंडेंचा आधी शनी शिंगणापुरात अभिषेक नंतर नगरमध्ये ‘वीरा’चं स्वागत !
धनंजय मुंडेंचा आधी शनी शिंगणापुरात अभिषेक, आता गहिनीनाथगड येथे महापूजा
(Dhananjay Munde Performs Pooja at Gahininath Gad with Pankaja Munde)