बीड : प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच जाब विचारत फैलावर घेतलं. धनंजय मुंडेंच्या ‘फैसला ऑन दि स्पॉट’ कार्यपद्धतीमुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केलं. (Dhananjay Munde slams officers in beed for delay in work)
बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण पार पडले. यावेळी पोलीस परेड करत मानवंदना देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांबरोबरच बीडकरांनी या ठिकाणी गर्दी केली होती. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत जिल्ह्याच्या विकास कामांत कमी पडणार नाही, अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली.
ध्वजारोहण पार पाडल्यावर धनंजय मुंडे हे बीडच्या विश्रामगृहात थांबले होते. नेहमीप्रमाणे मुंडे यांना भेटण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच जाब विचारत फैलावर घेतले. कामात हयगय नको, अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराची केस मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावरील संकट तूर्तास टळलं आहे. मात्र, या प्रकरणावरील प्रतिक्रिया अजूनही उमटत आहेत. भाजप नेत्या आणि धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांनी या प्रकरणावर नुकतंच मौन सोडलं. नैतिकदृष्ट्या धनंजय यांना आपला पाठिंबा नसल्याचं पंकजा यांनी स्पष्ट केलं. (Dhananjay Munde slams officers in beed for delay in work)
काय म्हणाल्या पंकजा?
धनंजय मुंडे प्रकरणाबाबत विचारण्यात आलं. तेव्हा, ‘तो विषय बऱ्यापैकी मागे पडलेला आहे. तरीही याच्यावर परत परत बोलावं लागू नये म्हणून तुम्ही आलाच आहात, तर सैद्धांतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, तात्त्विकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी कधीही करू शकत नाही’, असं पंकजा म्हणाल्या. पण ही प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
धनंजय मुंडेंवरील शुक्लकाष्ट टळलं, ‘चित्रकूट’ पुन्हा फुलला, पुष्पगुच्छांचा खच
धनंजय मुंडेंना ‘परस्पर संबंधावर’ पंकजांचा पाठिंबा नाहीच!; भाजपलाही फटकारले?
(Dhananjay Munde slams officers in beed for delay in work)