वंचितला मत म्हणजे भाजपला मदत, तुमचं मत वाया घालवू नका : धनंजय मुंडे

| Updated on: Sep 16, 2019 | 6:06 PM

यापूर्वीही राष्ट्रवादीने वंचितवर भाजपची बी टीम म्हणून आरोप केला होता, शिवाय संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे आरोप-प्रत्यारोप रंगले होते.

वंचितला मत म्हणजे भाजपला मदत, तुमचं मत वाया घालवू नका : धनंजय मुंडे
Follow us on

बीड : वंचित बहुजन आघाडीला मत देणं म्हणजे जातीयवादी भाजपला मदत करण्यासारखं आहे, याचा अनुभव लोकसभा निवडणुकीत घेतला आहे. पुन्हा तीच चूक करून आपले मत वाया घालवू नका, जो लेक तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करतो, त्याला एकदा संधी द्या, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde Vanchit Bahujan Aghadi) यांनी केलं. परळी शहरातील भिमनगर भागातील विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते (Dhananjay Munde Vanchit Bahujan Aghadi) बोलत होते.

काँग्रेसचे वंचितला सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचा दावा केलाय, तर काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादीचे नेते वंचितवर भाजपची बी टीम म्हणून आरोप करत आहेत. यापूर्वीही राष्ट्रवादीने वंचितवर भाजपची बी टीम म्हणून आरोप केला होता, शिवाय संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे आरोप-प्रत्यारोप रंगले होते.

शरद पवारांचीही वंचितवर टीका

यापूर्वी शरद पवारांनीही वंचितवर टीका केली होती. मतांचं विभाजन होऊन भाजपला फायदा होत असल्याचं शरद पवार म्हणाले होते. आता एक नवीन पार्टी आलीय, वंचित म्हणजे गरीब, पण तसं नाही.. त्याचा फायदा भाजपला होतोय. धर्मनिरपेक्ष मताची फाटाफूट होत आहे आणि त्यामुळे जातीयवादी पक्षाला त्याचा फायदा होतोय, असं शरद पवार म्हणाले होते.

वंचितचा पवारांबाबत गौप्यस्फोट

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून खळबळजनक आरोप करण्यात आलाय. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात दिल्लीत बैठक झाली, असा दावा वंचितने (Prakash Ambedkar sharad pawar) केलाय. शरद पवार यांनी याबाबत खुलासा करावा, अशीही मागणी वंचितकडून (Prakash Ambedkar sharad pawar) करण्यात आली आहे. 10 सप्टेंबरला दिल्लीत बैठक झाल्याचा वंचितचा दावा आहे.