बीड : बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण परळीत भावा-बहिणीची लढाई होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते धनंजय मुंडे विरुद्ध ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. दोघांचाही प्रचार अगदी जोरात सुरु आहे. पंकजा मुंडे यांच्या साथीला बहीण खासदार प्रितम मुंडे, आई प्रज्ञा मुंडे प्रचारात आहेत. तर धनंजय मुंडे यांच्यासाठी पत्नी राजश्री मुंडे (Dhananjay Munde wife Rajshree Munde) मैदानात उतरल्या आहेत.
राजश्री मुंडे (Dhananjay Munde wife Rajshree Munde) यांनी काल महिलां मेळावा घेतला. एकदा धनंजय मुंडे यांना निवडून द्या, परळीचा चेहरामोहरा बदलू, अशी भावनिक साद राजश्री मुंडे यांनी घातली.
परळी भयमुक्त करायची आहे, असं पंकजा मुंडे सातत्याने धनंजय मुंडेंना उद्देशून म्हणत असतात. मात्र इतकी गंभीर स्थिती असती तर हजारो महिला या मेळाव्याला आल्या असत्या का, असा प्रश्न राजश्री मुंडे यांनी उपस्थित केला.
राजश्री मुंडे म्हणाल्या, “धनंजय मुंडे विकासाचा मुद्दा घेऊन लढत आहेत. अठरा पगड जातीसाठी धनंजय मुंडेंनी काम केलं आहे. मला विश्वास आहे, ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. धनंजय मुंडे 100 टक्के निवडून येतील. मतदारांना माझं आवाहन आहे, परळीच्या मातीशी इमान राखणाऱ्या, परळीच्या सुख-दु:खात 24 तास धावून, तुमच्यासाठी स्वत:ला झोकून देऊन काम करणाऱ्या, तुमच्या भावाच्या आणि मुलाच्या मागे यावेळेस राहा.”
आमचे भाऊ दोन नंबरवाले- पंकजा मुंडे
मतदान यंत्रावर माझे भाऊ धनंजय मुंडे यांचा नंबर दुसरा आहे, कारण ते दोन नंबरवाले आहेत, अशा शब्दात महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी टीका (Pankaja Munde Criticises Dhananjay Munde) केली. बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.
संबंधित बातम्या