नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal on Delhi Election result) यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर जनतेचे आभार मानले. दिल्लीतील आपच्या कार्यालयाबाहेर केजरीवालांनी माध्यमांशी संवाद साधला. केजरीवाल म्हणाले, “सर्व दिल्लीवासीयांचे आभार. त्यांनी मला तिसऱ्यांदा निवडून देऊन ही संधी दिली. हा कामाचा विजय आहे, हा देशाचा विजय आहे, हा भारतमातेचा विजय आहे”, असं केजरीवाल (Arvind Kejriwal on Delhi Election result) म्हणाले. दिल्लीवालो आपने कमालही कर दिया, I Love You, असं म्हणत केजरीवालांनी दिल्लीकरांवरील प्रेम जाहीर केलं.
#WATCH Delhi: AAP chief Arvind Kejriwal at the party office says, “Dilli walon ghazab kar diya aap logon ne! I love you.” #DelhiElectionResults pic.twitter.com/8LeW9fr4EL
— ANI (@ANI) February 11, 2020
दिल्लीतील मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल समर्थकांशी संवाद साधत होते. केजरीवाल म्हणाले, “दिल्लीकरांनो तुम्ही कमालच केली. दिल्लीकरांनी तिसऱ्यांदा त्यांच्या मुलावर विश्वास दाखवला. हा विजय त्या प्रत्येक कुटुंबाचा आहे ज्यांनी मला आपला मुलगा समजून पाठिंबा दिला. दिल्लीच्या नागरिकांनी देशात नव्या राजकारणात जन्म दिला आहे, ते म्हणजे कामाचं राजकारण”
दिल्लीच्या नागरिकांनी देशाला संदेश दिला की, जो शाळा बांधेल, परिसरात स्वच्छता ठेवेल, विकासकामे करेल, त्यालाच मते मिळतील. हेच राजकारण देशाला 21 व्या शतकात घेऊन जाईल.
आज मंगळवार आहे आणि हनुमानाचा दिवस आहे. हनुमानाचेही खूप खूप धन्यवाद, असं केजरीवाल म्हणाले.
ज्यांनी मला आपला मुलगा मानत हे सगळं प्रेम दिलं, ज्यांच्या घरात चांगलं शिक्षण मिळालं, गरजा पूर्ण झाल्या त्या प्रत्येकाचा हा विजय आहे. एका नव्या राजकारणाचा जन्म दिला आहे. जो काम करेल, त्यालाच मत मिळेल. देशाला हे उदाहरण दिल्लीने दिलं आहे. देशासाठी हा मोठा शुभसंदेश आहे. हा आपल्या भारतमातेचा विजय, हा देशाचा विजय आहे, असं केजरीवाल म्हणाले.
आज मंगळवार आहे. हनुमानाचा दिवस आहे, असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी हनुमान चालिसावरुन भाजपला टोला लगावला. केजरीवालांनी एका मुलाखतीत हनुमान चालिसा म्हणून दाखवली होती. त्यावरुन दिल्लीच्या प्रचारात चांगलंच राजकारण रंगलं होतं. भाजपने केजरीवालांवर टीका करत, हा ‘चुनावी हनुमान भक्त’ असल्याचं म्हटलं होतं.
AAP chief Arvind Kejriwal: This is the day of Lord Hanuman who has blessed the people of Delhi. We pray that Hanuman Ji keeps showing the right path to us so that we continue to serve people for the next five years. #DelhiElectionResults pic.twitter.com/sXA2nA27uo
— ANI (@ANI) February 11, 2020
दिल्ली विधानसभा निकाल
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 63 जागांवर आघाडी घेत, ‘आप’ने पुन्हा दिल्लीवर झेंडा फडकावला आहे. (Delhi Vidhansabha Election Result) अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक करत, तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार हे निश्चित आहे. दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे. (Delhi Vidhansabha Election Result)