मुंबई : मोठी बातमी समोर येत आहे. एमसीए (MCA) कार्यकारिणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या वानखेडे स्टेडियमवर डिनर डिप्लोमसीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसियशनच्या कार्यकारिणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार, फडणवीस, शिंदे यांची ही डिनर डिप्लोमसी आहे. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच तिन्ही नेते एकत्र येणार येणार असल्यानं सर्वाचं लक्ष या डिनर डिप्लोमसीकडे लागलं आहे. येत्या 20 तारखेला गुरुवारी एमसीए कार्यकारिणीची निवडणूक आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, याच पार्श्वभूमीवर आता उद्या पवार, फडणवीस, शिंदे यांची डिनर डिप्लोमसी आहे.
एमसीए कार्यकारिणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या वानखेडे स्टेडियमवर पवार, फडणवीस, शिंदे यांची डिनर डिप्लोमसी होणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. महाविकास आघाडीची सत्ता जावून एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता प्रथमच एमसीए निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. या डीनर डिप्लोमसीसाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांची देखील उपस्थिती असणार आहे.
एमसीएच्या अध्यक्षपदाची लढत ही अमोल काळे आणि संदीप पाटील यांच्यामध्ये आहे. अमोल काळे हे पवार शेलार गटाचे उमेदवार आहेत. तर संदीप पाटील हे मुंबई क्रिकेट या गटाचे उमेदवार आहेत. दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरू आहे.