मुंबई : मागच्या काही दिवसांपासून शिवसेनानेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) आपल्या आक्रमक शैलीने विरोधकांना सळो की पळो करून सोडत आहेत. आताही त्यांनी ‘संभाजीनगर’च्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधलाय. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना माफी मागण्याचं आव्हान दिलं आहे. त्यांनी ट्विट करत भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावरही निशाणा साधलाय. देश झुकणार नाही, भाजपच्या पापात देश सामील होणार नाही, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलंय.
दिपाली सय्यद यांनी एक ट्विट केलंय. अप्रत्यक्षपणे अमित शाह यांच्यावर निशाणा साधलाय. “संभाजीनगर हे नाव आम्ही अभिमानाने घेत आहोत पण नुपूर शर्मा मुळे देशाचे नाव खराब होता कामा नये. देश नही झुकने दुंगा विसरलात का? भाजपच्या मोठाभाईला माफी मांगायला सांगा तुमच्या पापात देश सहभागी होणार नाही”, असं दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत.
संभाजीनगर हे नाव आम्ही अभिमानाने घेत आहोत पण नुपूर शर्मा मुळे देशाचे नाव खराब होता कामा नये. देश नही झुकने दुंगा विसरलात का? भाजपच्या मोठाभाईला माफी मांगायला सांगा तुमच्या पापात देश सहभागी होणार नाही. @narendramodi @ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) June 9, 2022
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहंमद पैगंबरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे जागतिक पातळीवर भारतााची प्रतिमा खराब झाली. नुपूर यांना पदमुक्त करण्यात आलं त्याच मुद्द्यावरून दिपाली सय्यद यांनी भाजपला घेरलंय. तसंच अमित शाहा यांना माफी मागण्याचं आव्हान दिलंय.
मागच्या काही दिवसांपासून दिपाली सय्यद आक्रमक झाल्या आहेत. उमा खापरे यांना भाजपकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यावर दिपाली सय्यद यांनी भाष्य केलंय. “उद्धव ठाकरेंचे आभार माना”, असा सल्ला दिपाली यांनी उमा खापरेंना दिला आहे. “उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले पाहिजेत. शिवसेनेमुळे भाजपात कोणी आमदार बनत असेल तर त्याबद्दल शिवसेनेचे कौतुकच आहे”, असं दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत.
उमा खापरे यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे आभार मानले पाहिजेत, शिवसेनेमुळे भाजपात कोणी आमदार बनत असेल तर त्याबद्दल शिवसेनेचे कौतुकच आहे. जय महाराष्ट्र @ShivSena @bjpsamvad
— Deepali Sayed (@deepalisayed) June 8, 2022