मुंबई : सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींलवर शिवसेना नेत्या (Shivsena) दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी भाष्य केलंय.देवा! लवकर आटप रे हे सगळं, हॅाटेलचं बिल वाढतंय, असं त्या म्हणाल्या आहेत. त्यांनी एक ट्विट शेअर केलं आहे. देवा लवकर आटप रे हे सगळं… हॅाटेलचं बिल वाढतंय. विरोधकांचा भाव वाढतोय, ED ची नोटीस लाव वाढतंय, शिवसैनिकांच्या मनातील घाव वाढतोय, आमदारांचा ताव वाढतोय, विधिमंडळातील डाव वाढतोय, लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेला चांगले दिवस दाखव रे महाराजा! होय महाराजा!”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
एक ट्विट शेअर केलं आहे. देवा लवकर आटप रे हे सगळं… हॅाटेलचं बिल वाढतंय. विरोधकांचा भाव वाढतोय, ED ची नोटीस लाव वाढतंय, शिवसैनिकांच्या मनातील घाव वाढतोय, आमदारांचा ताव वाढतोय, विधिमंडळातील डाव वाढतोय, लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेला चांगले दिवस दाखव रे महाराजा! होय महाराजा!”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
देवा लवकर आटप रे हे सगळं, हॅाटेल चे बिल वाढतोय, विरोधकांचा भाव वाढतोय, ED ची नोटीस लाव वाढतोय, शिवसैनिकांच्या मनातील घाव वाढतोय, आमदारांचा ताव वाढतोय, विधिमंडळातील डाव वाढतोय, लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेला चांगले दिवस दाखव रे महाराजा! होय महाराजा! @mieknathshinde
— Deepali Sayed (@deepalisayed) June 25, 2022
दिपाली सय्यद या आपली भूमिका ठामपणे मांडताना दिसतात. याआधीही त्यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर भाष्य करणारं ट्विट केलं होतं.“सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरेसाहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू”, असं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलं होतं.
सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू. @CMOMaharashtra @mieknathshinde
— Deepali Sayed (@deepalisayed) June 23, 2022
सध्या राज्यात राजकीय अस्थिरता आहे. अश्यात सगळीकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अश्यात दिपाली सय्यददेखील आपली मतं मांडताना दिसत आहेत.