“एकनाथ शिंदेंनी मला शिवसेनेत आणलं, उद्धव ठाकरेंनी मला शिकवण दिली, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?”, दिपाली सय्यद यांचं ट्विट

| Updated on: Jun 23, 2022 | 12:01 PM

नेमकी कोणती शिवसेना खरी, असा प्र्श्न उपस्थित झााल आहे. एकनाथ शिंदे यांनी आमचा गट म्हणजेच खरी शिवसेना असा दावा केलाय. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. यातच अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी एक ट्विट केलं आहे.

एकनाथ शिंदेंनी मला शिवसेनेत आणलं, उद्धव ठाकरेंनी मला शिकवण दिली, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?, दिपाली सय्यद यांचं ट्विट
Follow us on

मुंबई : सध्याची राजकीय परिस्थीती अस्थिर आहे. अश्यात नेमकी कोणती शिवसेना खरी, असा प्र्श्न उपस्थित झााल आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमचा गट म्हणजेच खरी शिवसेना (Shivsena) असा दावा केलाय. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. यातच अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी एक ट्विट केलं आहे. “एकनाथ शिंदेंनी मला शिवसेनेत आणलं, उद्धव ठाकरेंनी मला शिकवण दिली”, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?, असं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलं आहे.

“सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरेसाहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू”, असं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलंय.

हे सुद्धा वाचा

दिपाली सय्यद यांचं ट्विट

कालही दिपाली सय्यद यांनी एक ट्विट केलं होत. “माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या वनवासात कायम राहील. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे. आपले मत शिवसेनेला कायम राहील. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल”, असं त्या म्हणाल्या होत्या.

सध्याची राजकीय स्थिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक्झिटच्या तयारीत आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित झाला. मंत्रालयातल्या सर्व सचिवांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटणार आहेत. दुपारी 12.30 वा. ते ही भेट घेतील. यानंतर ते ऑनलाईन सर्व सचिवांना संबोधित करणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव, अतिरिक्त सचिव, प्रधान सचिव उपस्थित राहणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्रीपद सोडण्याआधी ते हे संबोधन करणार असल्याचं सांगितलं जातंय. सगळ्यांचे आभार मान्यासाठी आणि सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद देण्यासाठी उद्धव ठाकरे सचिवांना संबोधित करणार आहेत.