मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या लिलावतीमध्ये आहेत. आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्याआधी दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी एक ट्विट केलं आहे. “माननीय राजसाहेब आपण लवकरात लवकर बरे व्हा नाहीतर विधान परिषद निवडणुकीनंतर फडणवीससाहेब एकटे पडतील. भोंगा अजुन अर्धवट आहे”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेवर ट्विट केलं आहे. राज ठाकरे लवकरात लवकर बरे व्हा, असं दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत. तर पण त्यामागं कारणही दिपाली यांनी स्पष्ट केलंय. आज विधान परिषदेची निवडणूक होतेय. त्यानंतर देवेंद्र फडणवीस एकटे पडतील, त्यामुळे तुम्ही लवकर बरे व्हा, असं दिपाली म्हणाल्या आहेत. शिवाय भोंगा प्रकरणाचाही त्यांनी संदर्भ दिला आहे. भोंगा अजून अर्धवट असल्याचं त्यांनी म्हटलंय.
माननीय राजसाहेब आपण लवकरात लवकर बरे व्हा नाहीतर विधान परिषद निवडणुकी नंतर फडणवीस साहेब एकटे पडतील. भोंगा अजुन अर्धवट आहे. @mnsadhikrut @BJP4Maharashtra @ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) June 19, 2022
दिपाली यांनी याआधीही राज ठाकरे यांच्यावर टीका करणारं ट्विट केलं होतं. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाला. त्यानंतर त्यांच्या रखडलेल्या अयोध्या दौऱ्यावर भाष्य केलं. “आम्ही म्हणतोय ना तुम्हाला स्वयंघोषीत हिंदुजननायक मग अयोध्याला जायाची गरज काय आहे. आजपासून तुम्ही स्वयंघोषीत हिंदुजननायक!”, असं ट्विट दिपाली यांनी केलं होतं.
आम्ही म्हणतोय ना तुम्हाला स्वंयघोषीत हिंदुजननायक मग अयोध्याला जायाची गरज काय आहे. आजपासून तुम्ही स्वंयघोषीत हिंदुजननायक! @mnsadhikrut @ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) June 12, 2022
राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. सध्या ते लिलावती रुग्णालयात अॅडमिट आहेत. त्यांच्यावर आज शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्याआधी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी देवाकडे साकडं घातलं. मोरया गोसावी गणपती मंदिरात आरती करून प्रार्थना केली. पिंपरी चिंचवड मनसेचे सचिन चिखले यांच्यासह काही कार्यकर्ते उपस्थित होते.