मुंबई : मोठी बातमी समोर येत आहे. भायखळ्यात ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. ताडवाडी माझगाव येथील 209 आणि 210 क्रमांक शाखेतील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे फोटो हटवण्यात आल्यानं हा तणाव निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शिंदे समर्थकांकडून माझगाव येथील 209 आणि 210 क्रमांक शाखेतील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवण्यात आले. फोटो हटवण्यात आल्यानंतर ठाकरे समर्थ आक्रमक झाले. त्यानंतर दोन्ही गटात तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.
ताडवाडी माझगाव येथील 209 आणि 210 क्रमांक शाखेत असलेले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवण्यात आले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले. यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच शिंदे समर्थ आणि ठाकरे समर्थक कार्यकर्त्यांनी शाखेबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. वाढता तणाव लक्षात घेता, पोलिसांकडून शाखेबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला असून, शाखा बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
शाखेतून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवण्यात आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शाखा परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला असून, शाखा बंद करण्यात आली आहे. यानंतर ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटाचे कार्यकर्ते भायखळा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत.