Donald Trump India Visit : अमेरिका-भारताच्या संबंधांना मजबूत करणे आमच्या पार्टनरशिपचा महत्त्वाचा भाग : मोदी

| Updated on: Feb 25, 2020 | 2:00 PM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. आज या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे.

Donald Trump India Visit : अमेरिका-भारताच्या संबंधांना मजबूत करणे आमच्या पार्टनरशिपचा महत्त्वाचा भाग : मोदी
Follow us on

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या दोन दिवसीय भारत दौऱ्यावर (Donald Trump India Visit) आहेत. आज या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. भारत-अमेरिकेच्या नात्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज हैद्राबाद हाऊसमध्ये चर्चा करतील. त्यापूर्वी राष्ट्रपती भवनात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्या चर्चेनंतर अनेक करार होतील. तर अमेरिकेची फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प या आज नानकपुरा येथील एका सरकारी शाळेला भेट देतील.

LIVE UPDATES :

[svt-event date=”25/02/2020,2:00PM” class=”svt-cd-green” ] आर्थिक संबंधांना मजबूत करण्यासाठी अमेरिकेला भारतासोबत काम करुन चांगलं वाटतं आहे, आण्ही 5G टेक्‍नोलॉजी, इंडो-पॅसिफिकच्या परिस्थितीवर चर्चा केली : मोदी [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,1:58PM” class=”svt-cd-green” ] मेलानिया आणि मी भापताची महानता पाहून भारावून गेलो आहे. भारतीयांची अद्भूत दयाळूपणा पाहून आम्ही भावूक झालो. मोदी तुमच्या राज्यात आम्हाला जसं स्वागत मिळालं ते आम्ही नेहमी लक्षात ठेवू : डोनाल्ड ट्रम्प [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,1:55PM” class=”svt-cd-green” ] तीन अरब डॉलरपेक्षा जास्तचे संरक्षण विषयक करारांसाठी भारताने होकार दिला आहे. यामध्ये अपाचे आणि MH60 हेलिकॉप्‍टर यांचा समावेश आहे : मोदी [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,1:53PM” class=”svt-cd-green” ] तेल आणि गॅससाठी अमेरिका भारताचा महत्वपूर्ण स्रोत आहे. गेल्या चार वर्षांमध्ये आमचा एकूण ऊर्जा व्यापार जवळपास 20 बिलियन डॉलर इतका आहे : मोदी [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,1:45PM” class=”svt-cd-green” ] आज आम्ही अमेरिका-भारताच्या नात्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली, मग ते डिफेंस आणि संरक्षण का नसे, एनर्जी स्‍ट्रॅटेजिक पार्टनरशिप असेल, व्यापार किंवा परस्पर वैयक्तिक संबंध असेल, अमेरिका आणि भारतामधील सुरक्षा संबंधांना मजबूत करणे आमच्या पार्टनरशिपचा महत्त्वाचा भाग आहे : पंतप्रधान मोदी [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,1:41PM” class=”svt-cd-green” ] गेल्या आठ महिन्यात ही माझी आणि ट्रम्प यांची पाचवी भेट आहे. काल मोटेरा स्टेडियममध्ये ट्रम्प यांचं जे अभूतपूर्व आणि ऐतिहासिक स्‍वागत झालं, ते नेहमी स्मरणात राहिल, ते या दौऱ्यावर त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत आले याचा मला विशेष आनंद आहे : मोदी

[svt-event date=”25/02/2020,12:50PM” class=”svt-cd-green” ] “मी तुमचं आणि अमेरिकेच्या प्रतिनिधिमंडळाचं स्वागत करतो, मला माहिती आहे सध्या तुम्ही किती व्यस्त आहात, तरीही तुम्ही भारत दौऱ्यासाठी वेळ काढला, यासाठी मी तुमचे आभार मानतो”, असं मोदी म्हणाले [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,12:47PM” class=”svt-cd-green” ] डोनाल्‍ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हैद्राबाद हाऊसमध्ये चर्चा झाली, या दरम्यान ट्रम्प म्हणाले, “पीएम मोदी यांचे आभार मानतो, भारतात येणं ही सन्मानाची गोष्ट आहे, पीएम मोदी इथले लोक तुमच्यावर खूप प्रेम करतात, हे दोन दिवस अद्भूत होते”

[svt-event date=”25/02/2020,12:35PM” class=”svt-cd-green” ] हैद्राबाद दाऊसमध्ये ट्रम्प आणि मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा संपन्न, चर्चेनंतर मोदी आणि ट्रम्प यांची संयुक्त पत्रकार परिषद होईल

[svt-event date=”25/02/2020,11:49AM” class=”svt-cd-green” ] फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प दिल्लीच्या सरकारी शाळेत पोहोचल्या, लहान मुलांकडून पारंपरिक पद्धतीने फर्स्ट लेडीतं स्वागत

[svt-event date=”25/02/2020,11:45AM” class=”svt-cd-green” ] फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प दिल्लीच्या सरकारी शाळेत पोहोचतील [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,11:44AM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांचं हैद्राबाद हाऊसमध्ये स्वागत केलं [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,11:41AM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प दिल्लीच्या हैद्राबाद हाऊसला पोहोचले, इथे [svt-event date=”25/02/2020,12:34PM” class=”svt-cd-green” ] हैद्राबाद हाऊसमध्ये ट्रम्प आणि मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा संपन्न, चर्चेनंतर मोदी आणि ट्रम्प यांची संयुक्त पत्रकार परिषद [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,10:50AM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ड ट्रम्प यांनी राजघाटवरील व्हिजीटर बुकमध्ये संदेश लिहिला आणि महात्मा गांधींना श्रद्धांजली दिली, ट्रम्प दाम्पत्याने राजघाटवर वृक्षारोपण केलं


[/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,10:35AM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया राजघाटवर पोहोचले, इथे त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी उपस्थित

[svt-event date=”25/02/2020,10:30AM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया राजघाटकडे रवाना [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,10:20AM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांची उपस्थित पाहुण्याशी ओळख करवून दिली [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,10:07AM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ड ट्रम्प यांना आज भारतीय सैन्यदलाकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,09:58AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रपती भवनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहसह अनेक बडे नेते उपस्थित

[svt-event date=”25/02/2020,09:58AM” class=”svt-cd-green” ] अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेलानिया ट्रम्प राष्ट्रपती भवन येथे पोहोचले, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नींकडून ट्रम्प दाम्पत्याचं स्वागत

कसा असेल आजचा कार्यक्रम?

डोनाल्ड ट्रम्प सकाळी 9.45 वाजता हॉटेल आयटीसी मौर्य येथून (Donald Trump India Visit) राष्ट्रपती भवनला जाईल. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता राजघाटला भेट देतील. राजघाट येथून ते थेट इंडिया गेट येथील हैद्राबाद हाऊस जातील. दुपारी मेलानिया ट्रम्प नानकपुरामध्ये दिल्ली सरकारी शाळेला भेट देतील.

दरम्यान, हैद्राबाद हाऊसमधील बैठक संपल्यानंतर ट्रम्प दुपारी हॉटेल आयटीसी मौर्यला परततील. त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजता ते डिनरसाठी राष्ट्रपती भवनला पोहोचतील. त्यानंतर रात्री 9.30 च्या जवळपास ट्रम्प आणि त्यांचा संपूर्ण ताफा इंदिरा गांधी आतंरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. येथे ते अमेरिकेसाठी उड्डाण घेतील (Donald Trump India Visit).