मुंबई : (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतल्यापासून त्यांच्यासह इतर आमदारांवर (Shivsena Party) शिवसेनेकडून टीकास्त्र सुरु आहे. आतापर्यंत खालच्या पातळीवर टीका करु नका अन्यथा आम्हापण पातळी सोडावी लागेल असा इशारा अनेकवेळा शिंदे गटानेही दिला आहे. यापुढे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजकीय भूकंप होईल असे एक विधान केले आहे. 2019 मध्ये (MVA) महाविकास आघाडी बनवल्याने केवळ जनतेलाच धोका नव्हता तर आमच्यासाठीही मोठा धोकाच होता असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट म्हटले नसले तरी त्यांचा रोष तोच होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार बनवताना विचारात घेणे गरजेचे होते असे म्हणून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.
मुळात जनतेने शिवसेना-भाजप युतीकडे बघून कौल दिला होता. मात्र, 2019 मध्ये सरकार स्थापनेच्या प्रसंगी ना जनतेचा विचार झाला ना इतरांचा. त्यामुळे हे तीन पक्षाचे सरकार मुळात जनतेलाच नको होते. परंतू, राजकीय स्वार्थासाठी हे सर्व घडून आणले गेले. सध्याचे भाजप-सेनेचेच सरकार हे जनतेच्या मनातले आहे. आणि तेच घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न होता असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जो-तो शिंदे सरकारवर आरोप करीत आहेत. मात्र, पातळी सोडून बोलून चुकीचे आहे. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2019 च्या निवडणूकीनंतरची स्थिती सांगितली आहे. महाविकास आघाडी सरकारची स्थापना होतना किमान जनतेने आपल्या कोणत्या मुद्द्यावर निवडून दिले आहे, याचा विचार होणे गरजेचे होते. मात्र, केवळ जनतेलाच धोका नाहीतर असे म्हणत पुढचे बोलण्याला मुख्यमंत्र्यांनी बगल दिली पण त्यांचा रोष आहे जनतेबरोबर शिवसेनेतील अनेकांच्या मनात नसताना मविआ चे सरकारची स्थापना झाली असाच होता.
2019 मध्ये जी महाविकास आघाडीचे सरकार झाले ते सर्वसामान्य जनतेला तर मान्य नव्हतेच पण हे सरकार म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी प्रतारणा केल्यासारखे होते. याची जाणीव असतानाही केवळ सत्तेसाठी हे पाऊल उचलण्यात आले. उलट आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली नाही. मतदारांनी ज्यांना खऱ्या अर्थाने कौल दिला होता ते सरकार आज सत्तेत असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.