इंडिया आघाडीची चिंता करू नका, संजय राऊत यांचा भाजपला सल्ला

| Updated on: Nov 06, 2023 | 12:41 PM

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी इंडिया अलायन्सवर प्रतिक्रीया दिली आहे. या आघाडीमध्ये सर्वच पक्ष एकमेकांच्या संपर्कात असल्याचे संजय राऊत म्हणाले. 2024 ची लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्यासाठी हे सर्व मोठे पक्ष एकत्र आले आहेत या निवडणूकीत आम्हाला भ्रष्ट सरकारचा पराभव करायचा आहे असं संजय राऊत म्हणाले. 

इंडिया आघाडीची चिंता करू नका, संजय राऊत यांचा भाजपला सल्ला
संजय राऊत
Follow us on

नवी दिल्ली : इंडिया अलायन्यवर (INDIA Alliance) होत असललेल्या टिकेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. काही लोकांना इंडिया अलायन्सची फार चिंता वाटत आहे,  मात्र इंडिया अलायन्स अत्यंत ठीक चाललेलं आहे.  मोदींना आणि अमित शहा यांना चिंता करण्याची गरज नाही असं संजय राऊत म्हणाले. इंडीया अलायन्समध्ये विरोधी पक्षातल्या अनेक पक्षांचा समावेश आहे. विरोधी पक्षातील सर्वच मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी या आघाडीला पाठिंबा दिला आहे. सरकारच्या तानाशाही विरोधात इंडिया आघाडी आवाज उठवत असल्याचे संजय राऊत म्हणाले. या आघाडीमध्ये नितीश कुमार यांनी विशेष स्थान असल्याचेही ते म्हणाले.

सगळे पक्ष एकमेकांच्या संपर्कात

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी इंडिया अलायन्सवर प्रतिक्रीया दिली आहे. या आघाडीमध्ये सर्वच पक्ष एकमेकांच्या संपर्कात असल्याचे संजय राऊत म्हणाले. 2024 ची लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्यासाठी हे सर्व मोठे पक्ष एकत्र आले आहेत या निवडणूकीत आम्हाला भ्रष्ट सरकारचा पराभव करायचा आहे असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाहा यांच्यावरही निशाना साधला आहे. अमित शाहा यांनी स्वःताच्या घरात पाहावं इंडिया अलायन्स पाच राज्यात तुमचा दारूण पराभव करत आहेत असंही संजय राऊत म्हणाले, त्यामुळे तुम्ही घाबरून इंडियाचं नाव आता भारत करायला लागला आहात असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. विधानसभा  निवडणूकीनंतर आम्ही पुन्हा एकत्र मिळणार आहोत असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

इंडिया अलायन्य नेमकी कशी आहे

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला आव्हान देण्यासाठी देशातील 26 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत.  अनेक दशके जुन्या ‘यूपीए’ची जागा घेत या आघाडीला नावाच्या रूपाने नवी ओळख मिळाली आहे.  INDIA म्हणजेच इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स म्हणून ओळखले जाईल. मराठीत त्याचे नाव इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स आहे. या नावावर 26 पक्षांच्या नेत्यांचे एकमत झाले आहे.

2004 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 14 पक्षांचा समावेश असलेल्या निवडणुकांनंतर आघाडी तयार करण्यात आली – RJD, DMK, NCP, PMK, TRS, JMM, LJP, MDMK, AIMIM, PDP, IUML, RPI(A), RPI(G) आणि KC. (जे). याशिवाय चार डावे पक्ष सीपीएम, सीपीआय, आरएसपी आणि फॉरवर्ड ब्लॉकने सत्ताधारी यूपीए आघाडीला बाहेरून पाठिंबा दिला आहे.