सोलापूर: माझ्या भाषणाची क्लिप अर्धवट व्हायरल करण्यात आली असून, त्यात माझ्या वक्त्यव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असा दावा सोलापुरातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत केला.
मी देव आहे, आपणही देव आहे, चराचरात देव आहे म्हटले होते. मात्र मी देव आहे इतकाच व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. आधी आपल्याशी काही एक संबंध नसताना आपलाच डान्स आहे म्हणून तो व्हायरल करण्यात आला. मात्र याबाबत मी कोणालाच काही म्हणणार नाही. शिवाय यावर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, असं डॉ. जयसिदेश्वर शिवाचार्यांनी म्हटलं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे एक वक्तव्य दोन दिवसांपासून तुफान गाजत आहे. हे वक्तव्य ऐकल्यावर तुम्हाला ‘सेक्रेड गेम्स’मधील ‘गणेश गायतोंडे’ आठवल्याशिवाय राहणार नाही. सेक्रेड गेम्समध्ये ज्याप्रकारे गणेश गायतोंडे ‘अपुनिच भगवान है’ असे म्हणतो, त्याप्रमाणे भाजपचे सोलापुरातील उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी म्हणतात, ‘कुठेही देवदर्शनाला जा, तुम्हाल देव भेटणारच नाही, कारण मीच देव आहे’.
‘अपुनिच भगवान है’… सोलापुरात भाजपचा ‘गणेश गायतोंडे’
कुठेही देवदर्शनला जाऊ नका, करण मीच देव आहे, असा दावा डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केला आहे. तशी त्यांची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली.
VIDEO:
संबंधित बातम्या
‘अपुनिच भगवान है’… सोलापुरात भाजपचा ‘गणेश गायतोंडे’
सोलापुरात प्रकाश आंबेडकरांचे पारडे जड, बसप पाठोपाठ माकपचाही पाठिंबा
सोलापुरातील उमेदवार महास्वामींची संपत्ती केवळ 9 रुपये, मात्र कर्ज तब्बल…
सुशीलकुमारांच्या ‘दगडू’ तर जयसिद्धेश्वरांच्या ‘नुरन्दय्या’ नावाला अपक्ष उमेदवाराचा आक्षेप
55 मठ, 9 गुरुकुल, 200 एकर जमीन, शांतीगिरी महाराज लोकसभेच्या रिंगणात