Deepak Kesarkar : शिवसेना हा महाराष्ट्राचा कणा, केसरकर म्हणतात, द्रौपदी मुर्मूंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटावं, नवी समीकरणं तयार होतायत?

| Updated on: Jul 13, 2022 | 7:00 PM

Deepak Kesarkar : निलेश राणे हे वारंवार उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. भाजपकडून ठाकरे घराण्यावर कोणीही टीका करणार नाही अस आमच ठरलं आहे. त्यांनी दहा वेळा टीका केली तर मी दहा वेळा बोलणार.

Deepak Kesarkar : शिवसेना हा महाराष्ट्राचा कणा, केसरकर म्हणतात, द्रौपदी मुर्मूंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटावं, नवी समीकरणं तयार होतायत?
शिवसेना हा महाराष्ट्राचा कणा, केसरकर म्हणतात, द्रौपदी मुर्मूंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटावं
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: भाजपच्या (bjp) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या उद्या 14 जुलै रोजी मुंबईत येणार आहे. द्रोपदी मुर्मू उद्या मुंबईत येणार असल्याची माहिती शिंदे गटाचे बंडखोर आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले. द्रौपदी मुर्मू (draupadi murmu) यांचं आम्ही पारंपारिक पद्धतीने जंगी स्वागत करणार आहोत, असं केसरकर यांनी सांगितलं. ते मीडियाशी बोलत होते. भाजपने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला शिंदे गटालाही पाचारण करण्यात आलं होतं. त्यामुळे शिंदे गटाचे प्रतिनिधी म्हणून दीपक केसरकर या बैठकीसाठी आज दिल्लीत उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधून बैठकीतील माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. बारीक बारीक गोष्टींवर त्यांचं लक्ष आहे, असं केसरकर यांनी सांगितलं.

आजच्या बैठकीला एनडीएचे सर्व नेते उपस्थित होते. भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. द्रौपदी मुर्मू उद्या मुंबईत येत आहेत. आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर आदिवासी नागरिक आहेत. त्यांचं आम्ही पारंपारिक पद्धतीने मुंबईत स्वागत करू. ज्या भागात आदिवासी सर्वाधिक आहे अशा पाच राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे. त्यामुळे आम्ही त्यांचं जंगी स्वागत करू, असं सांगतानाच मुर्मू यांनी मातोश्रीवर जावं आणि उद्धव ठाकरे यांची भेट घ्यावी अशी आमची इच्छा आहे, असं केसरकर यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार

आमदार आणि खासदारांचं एकही मत वाया जाता कामा नये, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. मोदींचं शेड्यूल अत्यंत व्यस्त असूनही ते या निवडणुकीवर बारीक लक्ष देऊन आहेत. एवढी मोठी जबाबदारी हाताळतानाही मोदी कशा पद्धतीने परिस्थिती हाताळतात याचं हे उत्तम उदाहरण आहे, असं सांगतानाच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान कसं करायचं याचं आज मॉक ड्रिल झालं. आता या निवडणुकीसाठी प्रतिनिधी नेमायचे आहेत. राज्यांमध्ये दोन मॉक ड्रिल होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

पवारांच्या पालखीचे भोई होणार नाही

नेत्यांनी भूतकाळात जगू नये. वर्तमानकाळात जगावं. भाजपमध्ये आमची ताकद मिळाली तर बाकी पक्ष टिकणार नाहीत. आमचे कुटुंब प्रमुख आमच्या सोबत असतील याची मला खात्री आहे. यापूर्वीच शरद पवारांनी सांगितले की राण्यांना सेनेतून बाहेर यायला मी मदत केली. बाळासाहेबांचे शिवसैनिक पवारांच्या पालखीचे भोई कधीच होणार नाहीत, असंही ते म्हणाले. आमची एकी कधीही फुटणार नाही. शिवसेना हा महाराष्ट्राचा कणा आहे अभिमान आहे तो टिकला पाहिजे, असंही ते म्हणाले.