मुंबई – “अलीकडच्या काळात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (A. P. J. Abdul Kalam) आणि प्रणव मुखर्जी (Pranav Mukharjee) यांनी राष्ट्रपतीपदास (President) मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. देशातील अनेक स्वायत्त संस्था सरकारच्या बटीक असल्याप्रमाणे वागत असताना तळागाळातून राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचलेल्या द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) या सर्वोच्च सिंहासनाची बूज कशी राखतात हे पाहणे कुतूहलाचे असणार आहे. तूर्तास मुर्मू यांचे अभिनंदन! देश आज कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करत असताना निपक्ष व बाणेदार राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचा लौकिक व्हावा हीच सदिच्छा!” अशा शुभेच्छा सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आल्या आहेत.
देशाच्या प्रथम नागरिक तथा पंधराव्या राष्ट्रपती म्हणून अपेक्षेप्रमाणे द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार असलेल्या द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. अर्थात, भाजपच्या पाठीशी असलेले मोठे संख्याबळ आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच विरोधी पक्षांत नसलेली एकवाक्यता यामुळे या निवडणुकीचा निकाल काय असणार हे मतदानापूर्वीच जगजाहीर झाले होते. निवडणुकीची औपचारिकता पूर्ण झाली आणि देशातील सर्वात प्रतिष्ठत पदावर द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या. ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्याच्या कुसुमी तालुक्यातील उपरखेडा या लहानशा खेड्यातून देशातील सर्वात शक्तिशाली वास्तूमध्ये प्रवेश करणारया द्रौपदी मुर्मू देशातील पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती बनल्या आहेत. एक आदिवासी महिला प्रथमच देशाच्या राष्ट्रपतीपदावर आरूढ होणार असल्याने
एनडीएच काय, पण रालोआच्या सदस्य नसलेल्या पक्षांनीही द्रौपदी मुर्मू यांना आपला पाठिंबा आधीच जाहीर केला होता.
शिवसेनेनेदेखील याच मुद्दयावर द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. झारखंड मुक्ती मोर्चा, बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, तेलगू देसम आणि बहुजन समाज पार्टी या रालोआबाहेरील विरोधी पक्षांनीही द्रौपदी मुर्मू यांना समर्थन जाहीर केल्यामुळे
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे पारडे पूर्णपणे द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने झुकले होते. आश्चर्याची गोष्ट अशी की, आंध्र प्रदेशातील एकूण एक म्हणजेच शंभर टक्के मते मुर्मू यांच्या पारड्यात पडली. 64 वर्षीय द्रौपदी मुर्मू 25 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील
आणि मावळते राष्ट्रपत रामनाथ कोविंद यांच्याकडून पदभार स्वीकारतील. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्म झालेल्या आणि आजवरच्या सर्वात कर्म वयाच्या राष्ट्रपती होण्याचा मानद्रौपदी मुर्मू यांनी मिळवला आहे. ओडिशाच्या संथाल आदिवासी समाजात जन्मलेल्या द्रौपदी मुर्मू
यांच्या निवडीने देशभरातील आदिवासी समुदायाला आनंद होणे स्वाभाविक आहे.