मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: उद्या ईडी कार्यालयात जाणार आहेत. मात्र शरद पवारांच्या चौकशीसाठी ईडीची (ED unprepared sharad pawar) अद्याप तयारीच नसल्याचं समजतंय. ईडीकडे शरद पवारांसाठी प्रश्नावली (ED unprepared sharad pawar) तयार नाही.
ईडीने शरद पवारांना अद्याप चौकशीला बोलावलेलं नाही. शरद पवार स्वत: ईडी कार्यालयात जाणार आहेत. ईडीचे मुंबईचे सहसंचालक शरद पवारांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. केवळ अर्धा तास ते तासाभरात पवारांना ईडीमधून सोडलं जाईल.
शरद पवारांना तिसऱ्या टप्यात समन्स बजावून चौकशीला बोलावू शकतात. राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहारातील 25 हजारा कोटींच्या या व्यवहारात पैशांचा लाभ कुणाला हा तपासाचा मुख्य भाग आहे.
उद्या प्रश्न विचारणार नाही
दरम्यान, उद्या शरद पवार दुपारी ईडी कार्यालयात जातील. मात्र ईडीकडून त्यांना कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत. ईडीने अद्याप पवारांसाठीची प्रश्नावली बनवली नाही. ईडीने शरद पवार, अजित पवारांसह 70 जणांवर गुन्हा दाखल केला असला, तरी ईडीने अद्याप तपास अधिकाऱ्याचीही नेमणूक केलेली नाही.