मुंबई : महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकारमधील द्वंद सर्वश्रुत आहे. यातच आता पुन्हा एकदा दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून (editorial of saamana) टीका करण्यात आलीय. मात्र, यावेळी ‘सामाना’च्या अग्रलेखातून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर प्रहार करण्यात आलाय. फडणवीस यांनी घेतलेल्या शिर्डीतील (Shirdi Saibaba) साईबाबांच्या दर्शनाचा संदर्भ देत अग्रलेखातून फडणवीसांवर टीकास्त्र सोडण्यात आलंय. दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं की, ‘ श्री. देवेंद्र फडणवीस हे काल शिर्डीत साईचरणी गेले व म्हणाले, ‘‘राजकारण गेले चुलीत, मात्र इथले गव्हर्नन्स ठीक राहिले पाहिजे, पण त्याला बट्टा लागलाय. ही अवस्था महाराष्ट्रात कधीही पाहिली नव्हती.’’ राजकारण जाईल चुलीत, महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे असे शहाणपणाचे उद्गार फडणवीस यांनी साईचरणी काढले, पण महाराष्ट्राची इज्जत व गव्हर्नन्स चुलीत घालण्याचे काम ते स्वतःच करीत आहेत.’ असा प्रहार दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आलाय.
दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखात भाजप शासिक राज्ये आणि महाराष्ट्र अशी तुलना करत भाजपला टोला लगावण्यात आला आहे. ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे देवाच्या चरणी जाऊन बोलता हा महाराष्ट्रद्वेष म्हणजेच तुमचा गुड गव्हर्नन्स मानायचा काय? देवाच्या चरणी तरी खरे बोला! मुळात देशातील भाजपशासित राज्यांत गुड गव्हर्नन्सचा जो खेळखंडोबा चालला आहे त्याकडे एकदा डोळे उघडून पहा, म्हणजे महाराष्ट्रातील स्थितीविषयी सत्य समजायला मदत होईल.’ असं अग्रलेखात म्हटलंय.
पुढे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भाषणाचा संदर्भ देत म्हटलंय की, ‘पेन ड्राईव्ह ही आता नवीन पद्धत निघाली आहे. खोटे आरोप करायचे, केंद्रीय यंत्रणेची भीती दाखवायची, भ्रष्टाचाराचे आरोप करीत संबंध नाही त्यांच्याशी संबंध जोडायचे. एकीकडे कायदा सुव्यवस्था अडचणीत आहे, असं म्हणायचं आणि दुसरीकडे छोट्या छोट्या गोष्टीवरुन ‘मोर्चे’काढून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा असे उपद्याप राज्यातील विरोधी पक्ष करीत असल्याचे वळसे पाटलांचे म्हणणे आहे. ज्यांच्यावर स्वत:वरच भ्रष्टाचाराचे, जमीन घोटाळ्यांचे आरोप आहेत, असे भाजपचे युगपुरुष किरीट सोमय्या हे हाती कागदी हातोडा घेऊन, मुंबईतून भाडोत्री लोक घेऊन कोकणातील शांतता भंग करायला पोहोचले. काय तर म्हणे दापोलीतील अनधिकृत रिसॉर्ट तोडणार आहोत.’
दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातू यावेळी राणे निलेश राणेंवरही टीका करण्यात आलीय. ‘भाजपचे युगपुरुष किरीट सोमय्या हे हाती कागदी हातोडा घेऊन भ्रष्टाचविरुद्ध लढायला निघाले तर त्यांच्यासोबत कोण? ‘ईडी’कडे ज्यांच्या \मनी लॉण्डरिंग’चे 100 बोगस कंपन्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे दिले व ज्यांना तुरुंगात टाका, अशी मागणी केली त्याच नारायण राणे यांच्या मुलास बाजूला बसवून हे महाशय कोकणातील भ्रष्टाचार संपवायला निघाले.
इतर बातम्या
Apple for skin : सफरचंद त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, अशाप्रकारे फेसपॅक बनवा आणि सुंदर त्वचा मिळवा!
देशात प्रथमच पुण्यात ॲल्युमिनिअमचे मेट्रो कोचेस धावणार, मेक इन इंडियाचे स्वप्न साकार