आदित्य ठाकरे सक्षम नेता, त्यांच्यात काम करण्याची जिद्द : वर्षा गायकवाड

| Updated on: Aug 16, 2020 | 11:15 PM

आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून नक्कीच चांगलं काम केलं जाईल," असे वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad On Aaditya Thackeray) म्हणाल्या

आदित्य ठाकरे सक्षम नेता, त्यांच्यात काम करण्याची जिद्द : वर्षा गायकवाड
Follow us on

अहमदनगर : “पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे चांगल्या पद्धतीने काम करत आहे. ते एक सक्षम नेते आहेत,” अशी प्रतिक्रिया राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. “मुंबई पोलिसांची तुलना हे स्कॉटलँडच्या पोलिसांसोबत होते. त्याच मुंबई पोलिसांकडून अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास केला जात आहे,” असेही त्या म्हणाल्या. (Minister Varsha Gaikwad On Aaditya Thackeray)

“आदित्य ठाकरेंची पद्म पुरस्काराच्या शिफारस समितीच्या अध्यक्षपदी झालेली निवड योग्य आहे. जर एखादी व्यक्ती युवा असेल किंवा अनुभवी असेल, त्यांच्यात काम करण्याची जिद्द असणे महत्त्वाचे आहे. आदित्य यांच्यात ही जिद्द आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगलं काम केलं जाईल,” असेही त्यांनी सांगितले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरु आहे. याची सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे.

त्यावर वर्षा गायकवाड यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, “मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलँड पोलिसांसोबत होते आणि त्याच मुंबई पोलिसांकडून याचा तपास चालू आहे. ते सत्यता बाहेर आणतील,” असे त्या म्हणाल्या.  (Minister Varsha Gaikwad On Aaditya Thackeray)

संबंधित बातम्या : 

‘वादा किया है तो निभाना पडेगा’, नाहीतर राजीनामा द्या, बबनराव लोणीकरांचं नवाब मलिकांना आव्हान

येत्या 48 तासात मला एक खून करावा लागणार, विजय शिवतारेंच्या मुलाचे फेसबुक अकाऊंट हॅक