मुंबई : राज्यातील अकरावीच्या रखडलेल्या प्रवेश प्रश्नाबाबत येत्या एक-दोन दिवसात निर्णय होईल. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्याच्या महाधिवक्त्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. (Education Minister Varsha Gaikwad on FYJC admission)
“राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नयेत यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. घरी असलेल्या अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाईन क्लासेसद्वारे सुरु करण्यात आला आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नाहीत, त्यांना या कोचिंग क्लासेस लाभ घेता येईल,” अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली.
“राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रवेश झाले आहेत. मुलं घरी आहेत, त्यांचा अभ्यास सुरू व्हावा म्हणून ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहेत. पण ज्यांचे प्रवेश झाले नाहीत त्यांनी या क्लासेसचा लाभ घेता येईल,” असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
“यंदा दहावीच्या परीक्षेत 18 लाख विद्यार्थी पास झाले आहेत. त्यातील 11 लाख विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश दिला आहे. उर्वरित सात लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश लवकरच सुरु होतील,” असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
दरम्यान नुकतंच पालक संघ आणि कोचिंग क्लासेस मालक – शिक्षकांचे शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर ही भेट झाली. यावेळी राज ठाकरे यांनी कोचिंग क्लास चालक आणि पालकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचं निवेदनही स्वीकारलं. या मागण्या सरकार दरबारी मांडा, अशी विनंतीही या शिष्टमंडळाने राज ठाकरेंकडे मांडली.
त्यानंतर थेट पालकांसमोरच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना फोन लावून अकरावी प्रवेशाची समस्या मांडली. यावेळी आज संध्याकाळी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची आमची चर्चा आज संध्याकाळी होणार आहे. उद्या सकाळपर्यंत तुम्हाला त्याबाबतची माहिती देते, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. त्यावर राज यांनी अकरावी प्रवेशाचा निर्णय लवकरात लवकर घ्या, असं गायकवाड यांना सांगितलं. (Education Minister Varsha Gaikwad on FYJC admission)
संबंधित बातम्या :
आधी कोचिंग क्लासेसच्या शिष्टमंडळाशी बैठक, नंतर राज ठाकरेंचा थेट वर्षा गायकवाड यांना फोन
“माणुसकीचा फ्रीज”, घरातील अतिरिक्त खाद्य द्या, भुकेल्यांनी घेऊन जा, मनसेचा अभिनव उपक्रम