मुंबई: भाजप नेते एकनाथ खडसे यांचा संभाव्य पक्षांतराचा मुहूर्त टळला असला तरी खडसे पक्षांतर नक्की करतील, अशी विश्वासनीय सूत्रांची माहिती आहे. खडसे घटस्थापनेच्या दिवशी पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. ( Eknath Khadase and NCP leaders silent on changing of party)
एकनाथ खडसे यांच्या प्रवेशावर राष्ट्रवादीचे नेते मौन बाळगून आहेत. त्याबरोबर एकनाथ खडसे यांनी याबाबत चुप्पी साधली आहे. पत्रकारांनी त्यांना पक्षांतराबद्दल विचारले असता त्यानी नो कमेंटस,असे उत्तर दिले.
खडसे नेहमी आपले मत परखडपणे व्यक्त करतात, राष्ट्रवादी प्रवेशाबाबत विचारले असता त्यांनी चुप्पी साधल्याने कार्यकर्त्यांसह अनेकजण संभ्रमात आहेत.
जळगावात शुक्रवारी खडसेंनी “राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला काहीच बोलायचे नाही, नो कमेंट्स” असे उत्तर देत या विषयाचे खंडन केले. “माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत”, असेही ते यावेळी म्हणाले.
खडसेंना कृषिमंत्रीपद?
खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना ठाकरे सरकारमध्ये थेट कृषिमंत्री देण्यात येणार असल्याच्या चर्चा असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली होती. सध्या कृषी मंत्रीपद हे शिवसेनेकडे असून, सेनेचे दादा भुसे हे कृषी मंत्री आहेत. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ठाकरे सरकारमध्ये खात्यांची अदलाबदल करण्यात येण्याची शक्यता असून, शिवसेनेकडे असलेले कृषी मंत्रीपद राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाचे सारे मुहूर्त तुमचेच : एकनाथ खडसे
एखादा नेता पक्षात आल्यावर फायदा होता, तसा गेल्यावर तोटा होतो, पंकजा मुंडेंचं खडसेंवर भाष्य
( Eknath Khadase and NCP leaders silent on changing of party)