जळगाव : कोरोनामुळे किती त्रास होतो याची मला जाणीव आहे. त्यामुळेच मी वीस दिवस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो. मला अशा प्रकारची नौटंकी जमत नाही. जळगाव महानगरपालिका हातातून गेल्यामुळे गिरीश महाजन (Girish Mahajan) त्यांना चांगलाच झटका बसला. त्यामुळेच त्यांना ईडी वगैरे लक्षात येत आहे,” असे बोचरे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेतS एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप नेते गिरिश महाजन यांना दिले. ते ‘टिव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Eknath Khadse answers Girish Mahajan said he is shocked because loosing Jalgaon Municipal Mayor election)
गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वैर लपून राहिलेले नाही. आज (30 मार्च) बोलताना गिरीश महाजन यांनी खडसे यांना डिवचलं होतं. ईडीची तारीख आली की खडसे यांना कोरोना होतो, अशी बोटरी टीका महाजनांनी केली होती. त्यानंतर राजकीय गोटात अनेक चर्चा रंगल्या होत्या. गिरीश महाजनांच्या या वक्तव्याची दखल घेत खडसे यांनीसुद्धा महाजनांना जोरदार प्रत्युत्तर दिले. कोरोनामुळे किती त्रास होतो याची मला जाणीव आहे. कोरोनामुळे मी 20 दिवस बॉम्बे हॉस्पिटरमध्ये उपचार घेत होतो. मला अशा स्वरुपाची नौटंकी जमत नाही, असे खडसे म्हणाले.
यावेळी बोलताना खडसे यांनी महाजनांच्या वर्मावर बोट ठेवत भाजपला जळगाव महापालिकेत मिळालेल्या अपयशाची आठवण करुन दिली. गिरीश महाजन कोरोनामुक्त झाले त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो. मात्र जळगावची महानगरपालिका गिरीश महाजन यांच्या हातातून गेल्यामुळे त्यांना चांगलाच झटका बसला आहे. कदाचित त्यामुळे त्यांना ईडी वगैरे लक्षात येत आहे, असा टोला खडसे यांनी लगावला.
यावेळी पुढे बोलताना त्यांनी त्यांच्यावर असलेल्या ईडीच्या चौकशीबद्दलसुद्धा भाष्य केले. ईडीची चौकशी लावणारे महाजनच असल्याचे सांगत त्यांनी ईडीला भाजपकडून सूचना दिल्या जातात असे अप्रत्यक्षपणे सांगितले. ईडीची चौकशी दुसरं कोण लावतं?, ही चौकशी तुम्हीच लावली आहे. ईडी लावून छेडण्याचे काम तुम्हीच करता. त्यामुळेच तुम्हाला ईडी आठवत आहे, असा टोला खडसे यांनी महाजनांना लगावला.
इतर बातमी :
“ईडीची तारीख आली की खडसेंना कोरोना होतो”, गिरिश महाजनांचा खोचक टोला
Sharad Pawar health update: शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
जयंत पाटील म्हणाले, फडणवीस पंढरपुरातील उमेदवार मागे घेतील, आता दरेकरांचं मोठं वक्तव्य
(Eknath Khadse answers Girish Mahajan said he is shocked because loosing Jalgaon Municipal Mayor election)