जळगाव : “माझ्याविरुद्ध जे षडयंत्र रचले, ते देवेंद्र फडणवीस यांनी, मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला, हे नाव घेऊन सांगतो” असा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. मी पुरावे जमा केले आहेत, मी वरिष्ठांना जाब विचारणार, असेही खडसे यांनी सांगितले. लेखक सुनिल नेवे यांनी लिहिलेल्या ‘जनसेवेचा मानबिंदू’ या एकनाथ खडसे यांच्या चरित्राचे प्रकाशन मुक्ताईनगरमध्ये झाले. (Eknath Khadse Book launch criticizes Devendra Fadnavis)
“मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र यांना मुख्यमंत्री मिळाले, पण खान्देशला कधीच संधी मिळाली नाही. आमचा मुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) ड्राय क्लीनर, कोणावरही आरोप झाले, की लगेच क्लीन चिट मिळाली, मात्र खडसे यांना निर्दोष असताना क्लीन चिट नाही.” अशी खंतही खडसेंनी व्यक्त केली.
“लोक म्हणतात नाथाभाऊ यांचे काही अडकले असेल, म्हणून पक्षात अन्याय होऊनही ते पक्ष सोडत नाहीत. असं काही नाही, मी पक्षाविरोधात कधीही बोललो नाही. माझा जीव पक्षात लागला आहे, म्हणून सहन करतोय, पर्याय भरपूर आहेत” असे एकनाथ खडसे म्हणाले. एकनाथ खडसेंनी केली नाना ‘फडणवीसांच्या’ कारस्थानांवर पुस्तके लिहण्याची घोषणाही यावेळी केली.
“मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला, हे नाव घेऊन सांगतो. चुकीच्या निर्णयाविरुद्ध बंड करण्याची धमक ज्याच्यामध्ये असते त्यांच्यात स्वतःचे अस्तित्व निर्माण करायची धमक असते. ती धमक माझ्यात आहे, तुम्ही माझी शक्ती आहात. एकटा पडण्याची भीती त्यांना असते ज्यांना गुलाम म्हणून जगायची सवय असते. हांजी-हांजी करुन काही जण तिकीट मिळवतात” अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केली.
मुक्ताईनगरातील खडसे यांच्या फार्म हाऊसवर मान्यवरांच्या उपस्थितीत ‘जनसेवेचा मानबिंदू’ या एकनाथ खडसे यांच्या चरित्राचे ऑनलाइन प्रकाशन झाले. 219 पानी पुस्तकाच्या 10 हजार प्रतींचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमात एकनाथ खडसे यांच्या जीवनावरील डॉक्युमेंट्री फिल्म दाखवण्यात आली. एकनाथ खडसे यांच्या स्नुषा- खासदार रक्षा खडसे, कन्या रोहिणी खडसे खेवलकर, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, भुसावळचे आमदार संजय सावकारे, माजी आमदार चैनसुख संचेती उपस्थित होते. तर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे लाईव्ह उद्घाटनामध्ये सहभागी झाले.
VIDEO: VIDEO: Eknath Khadse | एकनाथ खडसेंवरील पुस्तक ‘ जनसेवेचा मानबिंदू’चे आज प्रकाशनhttps://t.co/yGrPFwFIhQ#EknathKhadse #BookPublication
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 10, 2020
संबंधित बातम्या :
‘एकनाथ खडसे यांनी शिवसेनेत यावं’, अब्दुल सत्तार यांची खुली ऑफर
एकनाथ खडसे यांनाही वाढीव वीज बिलाचा शॉक, एका महिन्याचं बिल तब्बल…
(Eknath Khadse Book launch criticizes Devendra Fadnavis)