जळगाव : राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. वाढत असलेल्या महागाईवरून (inflation) त्यांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हान केले. मात्र महागाईमुळे आनंद राहिला नाही, उत्साहही नाही असं खडसे यांनी म्हटलं आहे.
वाढत असलेल्या माहागाईवरून एकनाथ खडसे यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हन केले. मात्र महागाईमुळे आनंदही राहलीला नाही आणि उत्साहही नाही.
गणेशोत्सवासाठी लागणारे दही दूध आणि मोदकही महाग झाले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य हवालदील झाला आहे. महागाईमुळे यंदा गणरायाचे आगमन झाल्यावर होणाऱ्या आनंदावर विरजण पडले आहे. महागाई वाढतच आहे, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खडसे कुटुंबीयांनी गणरायाची विधीवत पूजा करत स्थापना केली. यावेळी एकनाथ खडसे यांच्यासह रक्षा खडसे, मंदाकिनी खडसे आणि कुटुंबीयांची उपस्थिती होती. खडसे कुटुंबीयांनी पूजा आणि आरती करून गणरायाची प्रतिष्ठापणा केली.
यावेळी एकनाथ खडसे आणि खासदार रक्ष खडसे यांनी गणरायाला साकडे घातले आहे. देशातील जनता सुखी, समाधानी राहुदे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी गणरायाकडे केली. देशात गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. कोरोना संकटानंतर प्रथम राज्यात यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. गणरायाच्या दर्शनसाठी अनेक ठिकाणी भाविकांनी रांगा लावल्याचे पहायला मिळत आहे.