नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केल्यानंतर आता एकनाथ खडसे यांची गेल्या 5 तासांपासून सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी कार्यालयात चौकशी सुरु आहे. तसंच खडसे यांच्या कन्याही सध्या ईडी कार्यालयात उपस्थित आहेत. दरम्यान, खडसे यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. हा एकप्रकारे प्रेशर टॅक्टिक्सचा भाग आहे. भाजपमधून बाहेर पडाल तर काय त्रास होतो हे त्यांना दाखवायचं असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केलीय. ते आज नाशिकमध्ये बोलत होते. (Chagan Bhujbal criticizes BJP over Eknath Khadse’s ED inquiry)
अन्य पक्षात असलेल्या लोकांना भास देऊन तो आपल्या पक्षात आला की त्याचे सगळे गुन्हे माफ केले जातात. भाजपकडून राजकारणात सध्या असे प्रयोग सुरु आहे. खडसे आणि आम्ही सगळे जण त्यांना निश्चितपणे उत्तर देऊ, असा इशाराही भुजबळ यांनी दिलाय. भारती पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मिळालेल्या संधीबाबत विचारलं असता कोरोना काळात आरोग्य खात्यासारखं महत्वाचं खातं त्यांना मिळालं आहे, त्याचा नक्कीच फायदा होईल, असं भुजबळ म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही खडसेंवरील ईडी कारवाईवरुन भाजपवर टीका केलीय. खडसे यांच्याविरोधात हे कुभांड रचले जात आहे, असा आरोप करतानाच खडसे यांच्यावर ज्या विषयावर कारवाई सुरू आहे त्यात अद्याप तथ्य आढळलेले नाही. किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. एक जागा त्यांनी रितसर घेतली त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. पण त्यामध्ये कुभांड रचून या सर्व एजन्सीमार्फत राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, आज सकाळी खडसे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. त्यापूर्वी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. भाजपसोडून राष्ट्रवादीत आलो. त्यानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे, असं सांगतानाच जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असं खडसे म्हणाले.
संबंधित बातम्या :
एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स, अचानक प्रकृती खालावली, महाराष्ट्राचं लक्ष लागलेली पत्रकार परिषद रद्द
एकनाथ खडसे ईडी कार्यालयात, भोसरी एमआयडी जमीन घोटाळ्याची चौकशी
Chagan Bhujbal criticizes BJP over Eknath Khadse’s ED inquiry