मी कोअर कमिटीत होतो, काढलं असेल तर माहिती नाही, बैठकांना निमंत्रण नाही : एकनाथ खडसे

| Updated on: Dec 10, 2019 | 5:05 PM

भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेऊन चर्चा केली (Eknath Khadse meet Pankaja Munde). तब्बल दोन ते अडीच तास ही चर्चा सुरु होती. भेटीनंतर खडसे यांनी पत्रकारांना भेटीदरम्यान झालेल्या चर्चेची माहिती दिली.

मी कोअर कमिटीत होतो, काढलं असेल तर माहिती नाही, बैठकांना निमंत्रण नाही : एकनाथ खडसे
Follow us on

मुंबई : भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेऊन चर्चा केली (Eknath Khadse meet Pankaja Munde). तब्बल दोन ते अडीच तास ही चर्चा सुरु होती. भेटीनंतर खडसे यांनी पत्रकारांना भेटीदरम्यान झालेल्या चर्चेची माहिती दिली. यावेळी त्यांनी अनेक खुलासे केले. मी कोअर कमिटीत होतो, मात्र सध्या कोअर कमिटीच्या बैठकांना आमंत्रण येत नाही. त्यामुळे कोअर कमिटीतून मला काढलं असेल, तर माहिती नाही, असं खडसे म्हणाले (Eknath Khadse meet Pankaja Munde).

एकनाथ खडसे म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याची चर्चा पंकजा मुंडे यांच्याशी करण्याची गरज नाही. माध्यमं सर्व दाखवत असतात. विनोद तावडेंना माझी मनधरणी करण्याची जबाबदारी दिली आहे की नाही याविषयी मला माहिती नाही. मात्र, मी आजही पक्षातच असल्याने मनधरणी करण्याची गरज नाही. मी पूर्वीही पक्षात होतो, पक्षाचं नेतृत्व केलं आहे. पण कुणाची मनधरणी करण्यासाठी कुणाची नेमणूक करावी, अशी प्रथा भाजपमध्ये याआधी तरी नव्हती. आता नव्यानं काही निर्माण झालं असेल, तर माहिती नाही.”

पंकजा मुंडे दरवर्षीच गोपीनाथ गडावर कार्यक्रम घेत असतात. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हजर असतात. अशावेळी पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देतात. गोपीनाथ गडावरील मेळाव्यावाला गोपीनाथ मुंडेंविषयी आस्था असणारे अनेक आमदार, माजी आमदार उपस्थित राहतील. यात माझ्यासह प्रकाश मेहता, राज पुरोहित, विनोद तावडे, गिरिश महाजन, आमदार माधुरी मिसाळ, माझ्या जिल्ह्यातील काही आमदार यांचा समावेश असेल, असंही एकनाथ खडसे यांनी नमूद केलं.

“गोपीनाथ गडावर राजकीय चर्चा होणार नाही”

एकनाथ खडसे म्हणाले, “गोपीनाथ गडावर शक्तीप्रदर्शन करण्याची आवश्यकताच नसते. कारण दरवर्षी लाखोंच्या संख्येने येथे मुंडे अनुयायी येतात. गोपीनाथ मुंडे हे ओबीसींचे मोठे नेते होते. त्यांनी सर्वांना मान्य असणारे नेतृत्व केलं आहे. म्हणूनच त्यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक येथे येतात. येथे राजकीय चर्चा होणार नाही. स्वतः गोपीनाथ मुंडे देखील भगवान गडावरील कार्यक्रमात राजकीय चर्चा करु नये, असं सांगायचे.”