आधी तावडेंनी खडसेंची भेट घेतली, आता खडसे पंकजांच्या भेटीला, नाराजांच्या भेटीगाठींना वेग

| Updated on: Dec 04, 2019 | 4:49 PM

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हे पंकजा मुंडे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत. आधी भाजप नेते विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ खडसे हे पंकजांच्या भेटीला निघाले.

आधी तावडेंनी खडसेंची भेट घेतली, आता खडसे पंकजांच्या भेटीला, नाराजांच्या भेटीगाठींना वेग
Follow us on

मुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हे पंकजा मुंडे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत. आधी भाजप नेते विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ खडसे हे पंकजांच्या भेटीला निघाले. (Eknath Khadse meet Pankaja Munde)

माजी मंत्री पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे.  विशेषत: पंकजा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे या चर्चांनी जोर धरला आहे. पंकजांनी 12 डिसेंबरला स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर समर्थकांना बोलावलं आहे. या मेळाव्यादरम्यान पंकजा मुंडे मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे आणि मुलगी रोहिणी खडसे यांना निवडणुकीत पाडण्यामागे भाजपमधील अंतर्गत कलह कारणीभूत असल्याचा आरोप केला होता. खडसेही भाजपवर नाराज आहेत.

या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे हे दुसऱ्या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेत आहेत. पक्षातील नाराजीनाट्यावर दोघांमध्ये खलबत झाल्याची शक्यता आहे. (Eknath Khadse meet Pankaja Munde)

खडसेंचा भाजपवर आरोप

भाजपने अंतर्गत राजकारणातून रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांना पाडले, असा खळबळजनक आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोड्या तर झाल्याच, पण त्यांना पाडण्याचे उद्योग झाले, असा घणाघाती आरोप खडसेंनी केला.

मी नाराज नाही : पंकजा मुंडे 

भाजपच्या नेत्या आणि माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं.  पंकजा मुंडे आपल्या पुढील वाटचालीबद्दल नेमकी काय घोषणा करणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. पंकजा मुंडे यांनी काल माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली (Pankaja Munde on His Facebook Post). यावेळी त्यांनी आत्मचिंतनासाठी आणि स्वतःशी बोलण्यासाठी वेळ हवा असल्याचं सांगितलं. तसंच आपण नाराज नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

पंकजांनी शिवसेनेत जावं : प्रकाश शेंडगे

भाजप नेत्या पंकजा मुंडे या ओबीसी असल्यामुळेच त्यांचं पक्षात खच्चीकरण केलं जात आहे, असा घणाघाती आरोप धनगर समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे (Pankaja Munde should join Shiv Sena:  Prakash Shendge) यांनी केला. इतकंच नाही तर पंकजा मुंडे यांनी हीच ती वेळ साधून, भाजपला सोडचिठ्ठी द्यावी आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा, असा सल्ला मी देईन, असंही प्रकाश शेंडगे म्हणाले.

संबंधित बातम्या  

रोहिणी खडसे, पंकजा मुंडेंना जाणीवपूर्वक पाडले, खडसेंचा गंभीर आरोप, धनंजय मुंडेंना मदत मिळाल्याचाही दावा

नाराजी नाट्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया   

…म्हणून पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा : प्रकाश शेंडगे