गिरीश महाजन यांच्या झटका देणाऱ्या मागणीनंतर एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा

| Updated on: Oct 25, 2022 | 6:02 PM

गिरीश महाजनांना जळी स्थळी पाषाणी फक्त नाथाभाऊचं दिसतोय. गिरीश महाजन हे अज्ञानी आहे आणि त्यांचा अभ्यासही कमी आहे असा टोला खडसे यांनी लगावला.

गिरीश महाजन यांच्या झटका देणाऱ्या मागणीनंतर एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : भोसरी जमीन प्रकरणात एकनाथ खडसे यांचे टेन्शन वाढवणारी मागणी त्यांचे ट्टर विरोधक तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली. भोसरी प्रकरणावर थेट विधिमंडळात चर्चा करण्याची मागणी महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना खडसे यांनी खळबळजनक दावा केला आहे.

महाजन यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच हा झोटिंग समितीचा अहवाल विधिमंडळात सादर करावा अशी मागणी केल्याची माहिती समोर येत आहे.

झोटिंग समितीचा अहवाल जनतेसमोर यायला हवा. खडसेंना क्लीन चीट दिली आहे किंवा नाही हे समोर आलेच पाहिजे असे गिरीश महाजन म्हणाले. यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

झोटिंग समितीच्या अनुसारच अँटीकरप्शनचा गुन्हा दाखल झालेला असल्यामुळे झोटिंग समितीचा आता कुठलाही रीलवन्स राहिलेला नाही असे खडसे म्हणाले.

वस्तुस्थिती गिरीश महाजन यांना माहीत नसावी आणि त्यामुळे असं वक्तव्य ते करत आहेत. झोटिंग समितीचा रिपोर्ट सरकारकडे उपलब्ध नाही हा माझा खळबळ दावा असल्याचेही खडसे म्हणाले.

मी स्वतः अजितदादा पवार यांच्याकडे लेखी स्वरूपात झोटिंग समितीच्या अहवालाची एक प्रत मला मिळावी अशी मागणी केली होती.
अजित दादांनी त्याची चौकशी केली. झोटिंग समितीचा रिपोर्ट सरकार दरबारीच नाही. मुख्यमंत्र्यांचे पूर्ण कार्यालय शोधून काढले. मात्र, अहवाल सापडला नाही. यामुळे तो विषय केव्हाच संपलेला आहे असा दावा देखील खडसे यांनी केला.

गिरीश महाजनांना जळी स्थळी पाषाणी फक्त नाथाभाऊचं दिसतोय. गिरीश महाजन हे अज्ञानी आहे आणि त्यांचा अभ्यासही कमी आहे असा टोला खडसे यांनी लगावला.

भोसरी भूखंडा प्रकरणी एकनाथ खडसे यांची नव्याने चौकशी करण्याची मागणी पुणे अँटी करप्शन विभागाच्या वतीने न्यायालयाकडे करण्यात आली आहे .भोसरी घोटाळा प्रकरणी खडसे यांना 2018 मध्ये ‘क्लीन चिट’ मिळाली होती.