मुंबई– गुवाहाटीत पार पडलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोरांच्या महत्त्वाच्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उपस्थित असल्याची माहिती आहे. भाजपाच्या या दोन मोठ्या नेत्यांची शिंदे गटाच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती असल्याची माहिती आहे. या बैठकीत सर्व बंडखोर आमदार उपस्थित असल्याची चर्चा होती. यावेळी सत्तास्थापनेचा फॉर्म्युला काय असेल याची चर्चा या बैठकीत झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीबाबत मात्र काय झाले, याची माहिती मात्र अद्याप मिळू शकलेली नाही. सत्तावाटपाचं सूत्र काय असेल, याचीही चर्चा या बैठकीत झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे आता आणखी काही घडमोडींना वेग येणार आहे.
दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान ही बैठक पार पडली. एकनाथ शिंदेंनी बैठकीची सुरुवात केली. त्यानंतर काही वेळाने फडणवीस आणि त्यानंतर अमित शाहा या बैठकीत ऑनलाईन उपस्थित असल्याची माहिती आहे. सर्व आमदार या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे. सत्ता स्थापनेबाबत या बैठकीत महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे. विषश्वसनीय सूत्रांनी ही माहिती टीव्ही9 ला दिलेली आहे.
यानिमित्ताने शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदारांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न भाजपाने केले असल्याचे सांगितले जाते आहे. १६ आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव, त्याबाबत विधानसभा उपाध्यक्षांनी पाठवलेली नोटीस, राज्यात होत असलेला विरोध, शिवसेना नेत्यांकडून होत असलेली टीका, यात संभ्रमात आलेल्या बंडखोर आमदारांना या बैठकीत शाह आणि फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पुढील सगळे व्यवस्थित होईल, असा विश्वासही या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे.
या महत्त्वाच्या बैठकीत सत्तावाटपाचे सूत्र ठरले असल्याची शक्यता आहे. त्यानंतर चारच्या सुमारास भाजपाची राज्याची को्र कमिटीची बैठक पार पडल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी ही बैठक पार पडली. यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित असल्याची माहिती आहे. येत्या काळात हा सत्तासंघर्ष अधिक तीव्र होईल, आणि भाजपा यात महत्त्वाची भूमिका बजावेल अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. भाजपने आज मुंबईतही काही महत्वाच्या बैठका घेतल्या आहेत.